शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे हातमजुरी करणा:या ग्राहकाला सव्वा लाखांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात हातगाडीवर मजुरी करणा:या इसमाला वीज वितरण कंपनीने सुमारे एक लाख 31 हजाराचे घरगुती वापराचे वीज बिल पाठविल्याने वीज कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. शहरातील सालदारनगर परिसरात  युवराज पानपाटील हे झोपडीत राहून हातगाडीवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात कुठल्याही प्रकारचे विजेवर चालणारे उपकरणे नाहीत. वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात हातगाडीवर मजुरी करणा:या इसमाला वीज वितरण कंपनीने सुमारे एक लाख 31 हजाराचे घरगुती वापराचे वीज बिल पाठविल्याने वीज कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. शहरातील सालदारनगर परिसरात  युवराज पानपाटील हे झोपडीत राहून हातगाडीवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात कुठल्याही प्रकारचे विजेवर चालणारे उपकरणे नाहीत. वीज वितरण कंपनीचे रीतसर मीटर बसवून नियमित येणारे वीज बिल भरायचे. मात्र फेब्रुवारी महिन्यात वीज कंपनीने चक्क एक लाख 25 हजार रुपये बिल पाठविले.जानेवारी 2018 ला 500 रुपये कंपनीचे वीज बिल आल्याने सदर ग्राहकाने ते भरलेही. सव्वा लाखाच्या बिलाची तक्रार संबंधित अधिका:यांकडे केल्याने 500 रुपये भरण्याची सक्ती केली व पुढील महिन्यात वाढीव जास्तीचे वीज बिल येणार नाही, असे सांगितले. मात्र सव्वा लाखांवरुन चालू महिन्यात एक लाख 31 हजारांचे वीज बिल वीज कंपनीने  पाठविले. चुकीचे बिल एकदा येऊ शकते मात्र दुस:यांदा पुन्हा वाढीव बिल पाठविणे चुकीचे व प्रिंट मिस्टेक म्हणता येणार नाही. सदर ग्राहकाचे  वीज मीटर रिडींगनुसार चालू महिन्यात 100 युनिट फिरले आहे.  बंगल्यात एसी, कुलरमध्ये राहणा:यांना एवढे बिल येत नाही मात्र झोपडीत राहणा:यांना एक लाख 31 हजाराचे बिल येत हा एक चर्चेचा विषय ठरला असला तरी गरीब काबाडकष्ट करणा:या इसमांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. झोपडी व हातगाडी विकूनही एवढी रक्कम भरू शकणार नाही, अशी कैफियत युवराज पानपाटील यांनी मांडली.