शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन’च्या प्रांगणात अवतरला सांस्कृतिक भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस़ए़मिशन ट्रस्टअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या एज्युकेशन कार्निवलचा समारोप शुक्रवारी करण्यात आला़ कार्निवलमधून एस़ए़मिशन हायस्कूलच्या प्रांगणात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एस़ए़मिशन ट्रस्टअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या एज्युकेशन कार्निवलचा समारोप शुक्रवारी करण्यात आला़ कार्निवलमधून एस़ए़मिशन हायस्कूलच्या प्रांगणात सांस्कृतिक भारत अवतरल्याचे दिसून आले होते़समारोपप्रसंगी डॉ़ राजकुमार पाटील, डॉ़ वृषाली पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ़ राजेश वळवी, प्राचार्या डॉ़ नूतनवर्षा वळवी, चेअरमन रेव्हरंड जे़एच़पठारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात बाला बलुतेदारी पद्धत, देशभक्तीपर गीतांवर विविध सांस्कृतिक नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि वाद्यांची ओळख, हस्तकला आणि विज्ञानाधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते़ यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वनुभावातून आनंद प्राप्त केला़ एकाच छताखाली विद्यार्थ्यांना सर्व माहिती देण्याच्या या उपक्रमात पालकांनीही आनंदाने सहभाग घेत धम्माल केली़ शुक्रवारी दिवसभरात मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली़ विद्यार्थ्यांसाठी सायन्स झोनच्या माध्यमातून आंतरेंद्रीय प्रतिकृती, भौतिक, रसायन या विषयातील संकल्पना मांडण्यात आल्या़देशभक्ती ही संकल्पलना असल्याने दोन दिवसात केजी टू ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली़