शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा केळी पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:56 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने केळी पिकाला फटका बसत आहे. शेतक:यांनी जीवापाड जपलेल हे पीक सध्या होरपळत असून, त्याचा उत्पनावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे.शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरात केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. सध्या बाजारात आंबे फळांची आवक जास्त असल्याने केळी पिकाचे भाव ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने केळी पिकाला फटका बसत आहे. शेतक:यांनी जीवापाड जपलेल हे पीक सध्या होरपळत असून, त्याचा उत्पनावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे.शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरात केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. सध्या बाजारात आंबे फळांची आवक जास्त असल्याने केळी पिकाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे. दरम्यान उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्णतेच्या झळा केळी पिकाला उध्वस्त करू पाहताहेत. सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसर्पयत राहत असल्याने उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश यामुळे केळीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या फळाची साल पिवळी पडणे, फणीतून केळी गळून पडणे, उष्ण हवेमुळे पाने फाटने हे दुष्परिणाम पहावयास  मिळत आहेत.दिवसरात्र परिश्रम करून जीवापाड जपलेले हे पीक असे वाया जाईल अशी चिंता शेतक:यांकडून व्यक्त होत आहे. आधीच पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच उत्पादनात घट झाल्यास उत्पादन खर्च निघेल की नाही, ही समस्या शेतक:यानं समोर उभी आहे.पीक संरक्षणासाठी शेतक:यांकडून उपाय योजना         केळी पिकाला वाढते तापमान घातक असले तरी योग्य उपाय योजना केल्यास पिकाचे संरक्षण होऊ शकते. त्यामुळे काही शेतक:यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. केळी बागेच्या अवती भवती प्रतिबंधक झाडे लावण्याची पद्धत सुरू असून, केळीच्या घडाला गोणपाट, पांढरे कापड, प्लास्टिक पिशवी लावण्यात येत आहे.