शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील सिंधी कॉलनीत किरकोळ वादातून एकाचा ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:46 IST

नंदुरबार : शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ या घटनेने ...

नंदुरबार : शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीसांनी सहा तासात तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे़जुनी सिंधी कॉलनी परिसरातील सिंधी समाज लाडकाना मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस एकाच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे रहिवाशांना दिसून आले होते त्यांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने याठिकाणी भेट दिली़ चौकशीअंती हा मृतदेह जुनी सिंधी कॉलनी येथील दिलीपकुमार गुरनामल राजपाल (४७) यांचा असल्याची माहिती समोर आली होती़ दिलीपकुमार राजपाल यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता़ सोमवारी रात्री १० ते मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान खुनाची घटना घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीसांकडून तपास करण्यात येत होता़ अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनेची माहिती घेत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाची नियुक्ती केली होती़ नियुक्त पथकाने परिसरात चौकशी करुन अवघ्या सहा तासात तिघांना सिंधी कॉलनीतून अटक केली़ पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, पोलीस नाईक कपिल बोरसे, राकेश मोरे यांनी संशयितांना ताब्यात घेतले़याबाबत मोहन गुरनामल राजपाल रा़ जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार करत आहेत़