शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात युरिया खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:41 IST

प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते ...

प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते खरेदी करुन शेतक:यांना काही प्रमाणात खते उपलब्ध केली आहेत़ त्यामुळे खरेदी विक्री संघात खते घेण्यासाठी शेतक:यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े शेतक:यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत़ आंतर्गत मशागती पूर्ण झाल्या आहेत़ मात्र पिकांना खते मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आज तरी खते मिळतील या आशेने रोज तालुक्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र व खरेदी विक्री संघ यांच्याकडे पायपीट करीत आहेत़ पिकांना खतांची नितांत गरज असून शेतक:यांना खतांसाठी भटकंती करावी लागत असल्याने शेतक:यांची             मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े               याबाबत ‘लोकमत’तर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे मोहिम अधिकारी प्रशांत शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भुसावळ-सूरत रेल्वे लाईनचे काम सुरु असून दौडाईच्यार्पयत खते येणे कठीण असल्याचे रेल्वे अधिका:यांचे म्हणणे आह़े दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण झाल्यावर खतांची टंचाई दूर होणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आह़े रेल्वे कामामुळे नंदुरबारसह धुळे येथेही खतांची टंचाई निर्माण झालेली आह़े नंदुरबारात जळगाव येथून काही प्रमाणात खते आणून त्यांची विक्री करण्यात येत आह़े काही दिवसांपूर्वी खते विक्रेत्यांकडे मुबलक प्रमाणात खतांची मात्रा उपलब्ध झाली होती़ परंतु त्यांच्याकडून नेहमीच्याच ग्राहकांना खतांची विक्री केली होती़ त्यामुळे यापासून बहुतेक शेतकरी वंचित राहिले होत़े कृषी विभागाने शेतक:यांची गरज लक्षात घेता खतांची टंचाई त्वरीत मिटवावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े खतांअभावी शेतीचेही मोठे आर्थिक नुकसान होत आह़े खतांची टंचाई दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला        आह़े