शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे पिक आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : सततच्या हवामानातील बदलांमुळे तळोदा तालुक्यातील ऊस पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : सततच्या हवामानातील बदलांमुळे तळोदा तालुक्यातील ऊस पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आह़े हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसत असल्याची स्थिती आह़े सध्या तळोदा व शहादा तालुक्यातील ऊस पिकांवर पांढरी माशीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आह़े याचा परिणाम उसाच्या उत्पादन क्षमतेवर होईल या भितीपोटी ऊस उत्पादक शेतकरी भितीग्रस्त झाला आह़े पांढरीमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेक:यांनी जैविक व रासायनिक नियंत्रण पध्दतीचा अवलब करुन आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आह़े कधी थंडीची लाट तर कधी ढगाळ हवामानामुळे वातावरणात वारंवार बदल घडून येत आहेत़ वातावरणातील बदलांमुळे जैविक किडींचा प्रादुर्भाव वाढत आह़े त्याचा फटका शहादा तळोदा तालुक्यातील ऊस पिकावर होऊन पांढ:या माशीचा प्रादुर्भावामुळे ऊस पिक मोठय़ा प्रमाणावर नुसासानीची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पांढ:या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऊस उत्पादक शेतक:यांनी जैविक व रासायनिक नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे फायदेशिर ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आह़े जैविक पध्दतीने किड नियंत्रण करण्यासाठी ‘क्रायसोपा’ अंडीपूंज दोन हजार प्रती एकरी वापरावी असा सल्ला देण्यात येत आह़े सध्या बहुतेक ठिकाणी ऊस तोडणीवर आलेला आह़े तर काही ठिकाणी उसाची वाढ होत आह़े आधीच अल्प पावसामुळे उसासह इतर रब्बी पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आह़े पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटल्याने शेतक:यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यातच आता बदलत्या हवामानाचा फटका उसाला बसत असल्याने तोडणीवर आलेला उसाचा दर्जा खालावत असल्याने त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याचे दिसून येत आह़े किड नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतक:यांना मार्गदर्शन करण्यात येत आह़े गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील वातावरणात वेगाने बदल होताना दिसून येत आह़े मध्येच थंडी तर माध्येच उकाडा जाणवत आह़े आता तर गेल्या चार दिवसांपासून विविध ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आह़े ढगाळ हवामानामुळे याचा फटका रब्बी पिकांवर बसण्याचा धोका आह़े त्याच प्रमाणे हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आह़े पुढील काही दिवस हेच वातावरण कायम राहिले तर मात्र पिकांना मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होणार आह़े दरम्यान, किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक:यांनी एक वेळा किटक नाशक फवारणी करावी असा सल्ला देण्यात येत आह़े