शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पपई रोपांवर ‘क्रॉप कव्हर’चे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:44 IST

शेतक:यांकडून प्राधान्य : सोलापूर पॅटर्नचा अवलंब करून पपईचे उत्पन्न वाढणार

लोकमत ऑनलाईनलहान शहादे, दि़ 8 : नर्सरीतून आणली जाणारी कोवळी झाडे लागवड केल्यानंतर पाणी देऊनही तीव्र उष्णतेने जळत असल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत होत़े यातून शेतक:यांनीच मार्ग काढून क्रॉप कव्हरचा नवा पर्याय निवडला आह़े सध्या नंदुरबार व शहादा तालुक्यात या क्रॉप कव्हरचीच चर्चा आह़े पपई उत्पादनात राज्यात दुसरा क्रमांक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदाही किमान 2 हजार 300 हेक्टर क्षेत्रार्पयत पपई लागवड होण्याची चिन्हे आहेत़ ऐन उन्हाळ्यात होणा:या या लागवडीनंतर तीव्र उष्णतेतून रोपांची वाताहत होण्याचे प्रकार सातत्याने घडत होत़े यावर मार्ग काढून शेतक:यांनी सोलापूर जिल्ह्यात भेटी देत तेथील शेतक:यांकडून वापरण्यात येणा:या क्रॉप कव्हरची माहिती घेऊन त्याचा वापर सुरू केला आह़े यातून रोपांचे सरंक्षण होऊन नुकसान कमी होणार आह़े नंदुरबार तालुक्यातील बामडोद, समशेरपूर, लहान शहादे यासह विविध भागात या क्रॉप कव्हरचा सर्वाधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत़ सरीमध्ये आठ बाय आठ अंतर ठेवत रोपाच्या चारही बाजूस चार काडय़ा लावून त्यावर क्रॉप कव्हर चढवले जात आह़े यासाठी लागणा:या काडय़ा शेतकरी सुबाभळीचे उत्पादन घेणा:या शेतक:यांकडून खरेदी करत आहेत़ नंदुरबार तालुक्यात गेल्या 10 दिवसात किमान 100 एकरात लागवड झालेल्या पपईपैकी 70 एकरावर क्रॉप कव्हर करण्यात आले आह़े जाळीदार कागदापासून तयार झालेल्या या एका कव्हरची किंमत साधारण 1़30 ते 2़30 रुपये एवढी आह़े गुजरातसह पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी त्याची खरेदी करून आणत आहेत़ यामुळे मजुरांच्या रोजगारातही वाढ झाली आह़े नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित करण्यात येणा:या पपईला यंदा सात रूपये प्रतिकिलो दर व्यापा:यांनी दिल्याने शेतक:यांचा हंगाम ब:यापैकी यशस्वी झाला आह़े यामुळे पपई लागवड क्षेत्र वाढीचे संकेत आहेत़ यंदाच्या वर्षात शेतकरी सोलापूर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील आणंद आणि स्थानिक नर्सरीकडून रोपे तयार करून घेण्यावर भर देत आहेत़ राज्यातील पहिली पपई नर्सरीचा मान असलेल्या सोलापूर येथील नर्सरीतून एका शेतक:याने आठ हजार रोपांची खरेदी करून आणली आह़े त्यांच्याकडून तब्बल आठ एकरात यंदा पपई लागवड झाली असून त्यावर क्रॉप कव्हरही लावण्यात आले आह़े