शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

पाण्यासाठी शेतक-यांवर दाखल होणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:57 IST

पाटबंधारे विभागाचे अजब आदेश : पाणी चोरीच्या तोंडी माहितीवरून काढले पत्र

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : वावद, ता़ नंदुरबार येथील लघु प्रकल्पातून सिंचनासाठी शेतकरी पाणी चोरी करत असल्याचा आरोप करत लघुपाटबंधारे विभागाने शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले आहेत़ या आदेशांपूर्वी  नंदुरबार उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर याठिकाणी असा कोणताच प्रकार नसल्याचे समोर आल्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत़    वावद लघुतलावातून पाणी चोरी होत असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी धुळे पाटबंधारे विभागाला अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती़ या तोंडी माहितीनंतर धुळे पाटबंधारे विभागाने नंदुरबार येथील अधिका:यांना तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या़ यानुसार सोमवारी सकाळी उपविभागीय अभियंता एम़बी़ पाटील, शाखा अभियंता एऩएस़ पेटकर, आऱबी़ सोनार, योगेश कोळी, कालवा चौकीदार शंकर गवळी यांच्या पथकाने वावद येथे भेट देत पाहणी केली होती़ या वेळी त्यांना याठिकाणाहून पाणी चोरी होत असल्याचा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याचा अहवाल दुपारी 12 वाजेर्पयत धुळे कार्यालयात पाठवण्यात आला़ यानंतरही  धुळे येथील मुख्य कार्यालयाने सोमवारी दुपारीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना पत्र देत शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या शेतक:यांना गेल्या वर्षी पाणी उपसा करण्याची परवानगी होती़ यंदा मात्र या शेतक:यांनी कोणत्याही प्रकारे पाणी उपसा केला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे असतानाही विभागाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत़ विशेष म्हणजे वावद लघुतलावात केवळ 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध आह़े पाटबंधारे विभागाने गेल्या रब्बी आणि चालू खरीप हंगामासाठी एकाही शेतक:याला यंदाच्या वर्षात पाणी परवानगी दिलेली नाही़ यापूर्वी परवानगी घेणा:या शेतक:यांनी मोटारी उचलून घेतल्या आहेत़ वावद ता़ नंदुरबार येथील लघुप्रकल्पातून पाणी उपसा करणा:या 10 शेतक:यांनी पाणी उपसा करण्यासाठी केवळ ईलेक्ट्रीक मोटार लावून पाणी उपसा करण्याची परवानगी असताना तलावाच्या जमिनीत 200 फूट खोल कूपनलिका करून त्यातून पाणी उपसा सुरू केल्याचे तसेच शेतक:यांनी 4 किलोमीटर्पयत पाईप लाईन टाकून नगदी पिकांसाठी पाणी चोरी केल्याची तक्रार पाटबंधारे विभागाच्या धुळे कार्यालयात केली होती़ 4यानुसार धुळे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना पत्र पाठवून पाणी उचलणा:या शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले आह़े विशेष बाब म्हणजे नंदुरबार कार्यालयाचे उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांनी पडताळणी करून अहवाल पोहोचवण्यापूर्वीच कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिका:यांना हे पत्र दिले आह़े