शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उमरकुवा येथे मारहाण प्रकरणी अखेर जादुटोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:21 IST

कोठार : उमरकुवा ता. अक्कलकुवा येथे डाकीण ठरवुन मारहाण केलेल्या प्रकरणात आरोपींविरुद्ध मंगळवारी अखेर जादुटोना विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल ...

कोठार : उमरकुवा ता. अक्कलकुवा येथे डाकीण ठरवुन मारहाण केलेल्या प्रकरणात आरोपींविरुद्ध मंगळवारी अखेर जादुटोना विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डाकिणीच्या संशयावरून अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथील महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेत त्या पीडित महिलेचा हात मोडला होता. मारहाण करण्याच्या विरोधात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन डाकीणीच्या संशयावरून मारहाण केली व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींवर जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे आवश्यक असतांना अन्य कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत असलेली उदासिनता व जनजागृतीच्या अभावाबाबत ‘लोकमत’ने रविवारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे घडलेला प्रकार लक्षात घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींवर जादुटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अखेर मंगळवारी अगोदर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जादुटोणाविरोधी कायद्याचे वाढीव कलम लावण्यात आले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ नुसार वाढीव कलम लावण्यात आले.दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकत्यांनीदेखील त्या महिलेची भेट घेवून घडलेला प्रकार जाणून घेतला.विधीज्ञांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी आरोपींवर जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन करण्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रबोधनासाठी पोलिस पाटीलांचे प्रशिक्षण अंनिस व पोलिस प्रशासनाच्या वतीने आगामी काळात घेण्यात येईल.-मेघश्याम डांगे, पोलिस निरीक्षक, अक्कलकुवा़