शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पटपडताळणीप्रकरणी नटेश्वर व मानमोडे शाळेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोगस पटपडताळणी प्रकरणी नटेश्वर विद्यालय नटावद, ता.नंदुरबार व माध्यमिक विद्यालय, मानमोडे, ता.शहादा या शाळांवर अपहराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण आठ शाळा असून आता सहा शाळांवर कधी गुन्हे दाखल होतात याकडे लक्ष लागून आहे.शासनाने 2011 मध्ये पटपडताळणी केली होती. या वेळी ज्या शाळांनी बोगस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोगस पटपडताळणी प्रकरणी नटेश्वर विद्यालय नटावद, ता.नंदुरबार व माध्यमिक विद्यालय, मानमोडे, ता.शहादा या शाळांवर अपहराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण आठ शाळा असून आता सहा शाळांवर कधी गुन्हे दाखल होतात याकडे लक्ष लागून आहे.शासनाने 2011 मध्ये पटपडताळणी केली होती. या वेळी ज्या शाळांनी बोगस पटपडताळणी दाखविली त्या शाळांवर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. नुकतेच न्यायालयानेही याबाबत आदेश दिल्याने आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकुण आठ शाळा आहे. पैकी दोन शाळांवर गुन्हे दाखल झाले.नटावद, ता.नंदुरबार येथील नटेश्वर विद्यालयात ऑगस्ट व ऑक्टोबर 2011 मध्ये वेगवेगळी पटसंख्या दाखविण्यात आली होती. त्या आधारावर एका शिक्षकास नियुक्ती देवून त्यास तीन लाख रुपये वेतनापोटी शासनाकडून रक्कम देण्यात आली. याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी चिंधू कौतिक पाटील यांनी फिर्याद दिल्याने तत्कालीन संस्थाध्यक्ष कै.बी.के.रघुवंशी, सचिव यशवंत पाटील व मुख्याध्यापक फत्तूसिंग गावीत यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.याशिवाय ज्ञान प्रबोधिनी विद्यामंदीर दोंडाईचा संचलित माध्यमिक विद्यालय मानमोडे, ता.शहादा येथे देखील ऑगस्ट ते ऑक्टोबर 2011 या काळात शाळेने बोगस पटसंख्या दाखवून 486.750 किलो तांदूळ आणि तीन हजार 894 रुपये मानधन शाळेने हडप करण्यात आले. याबाबत गटशिक्षणाधिकारी आनंदराव दगा पाटील यांनी फिर्याद दिल्याने संस्थाध्यक्ष वसंत छगन चौधरी, भुपेंद्र छगन चौधरी रा.दोंडाईचा व मुख्याध्यापक सुधाकर सैंदाणे, शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.