शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकाच्या पालकांवर गुन्हा

By admin | Updated: February 8, 2017 01:15 IST

रुग्णालयात उपचार : अक्कलकुवा येथे सापडले होते बालक

नंदुरबार : अक्कलकुवा बसस्थानक परिसरात गेल्या आठवडय़ात  बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षीय कुपोषित बालकाच्या अज्ञात मातापित्यांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला़ या बालकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ अक्कलकुवा बसस्थानकात एक फेब्रुवारी दुपारी साडेबारा सुमारास अज्ञात व्यक्तीने काटेरी झुडपांमध्ये बालक बेवारस पद्धतीने सोडून दिल्याचे दिसून आले होत़े बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले होत़े या बालकाला ताब्यात घेत पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिले होत़े याठिकाणी त्याचे वजन केले ते चार किलोपेक्षा कमी भरल्याने बालक कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले होत़े या बालकाच्या सर्व तपासण्या पूर्ण करण्यात येऊन त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रताप चाटसे उपचार करत आहेत़ पोलिसांकडून या बालकाच्या माता पित्यांचा शोध घेतला जात होता़ मात्र ते मिळून न आल्याने पोलीस प्रशासनाने अज्ञात मातापित्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता़ यानुसार सोमवारी दुपारी पोलीस कॉन्स्टेबल खुशाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन वर्षीय कुपोषित बालकाच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दुर्गम, अती दुर्गम भागासह तालुक्यातील विविध भागात जावून बालकाच्या माता पित्याचा शोध घेत आहेत़ धडगाव व अक्कलकुवा परिसरात याबाबत माहिती देण्यात येत आह़े तसेच पोलिसांकडून स्थलांतर करणा:या मजुरांकडेही चौकशी करण्यात येत आह़े या बालकाच्या विविध तपासण्या पूर्व करण्यात येऊन त्याच्यावर उपचार करण्यात येत आह़े अक्कलकुवा रुग्णालय प्रशासनाकडून या बालकाला सकस आहार व दूधासह इतर पदार्थ पुरवण्यात येत आहेत़ या कुपोषित बालकाची प्रकृती सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली आह़े