शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत 61 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयितांमध्ये सरपंच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयितांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकासह आणखी दोघांचा समावेश आह़े चौघांनी मिळून 61 लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आह़े बंधारे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजनांसाठी आलेल्या निधीचा वापर न करता परस्पर हडप केल्याप्रकरणी नवापुर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होत़े सरपंच हेमा हरीश्चंद्र पाडवी, ग्रामसेवक रघुनाथ शिवाजी गावीत, सरला कृष्णा वसावे आणि नानसिंग अजनसिंग वसावे सर्व रा़ बंधारे यांनी 1 नोव्हेंबर 2011 ते 26 जुलै 2018 यादरम्यान शासनाकडून बंधारे ग्रामपंचायतीसाठी आलेल्या 61 लाख 83 हजार 204 रुपये धनादेशाद्वारे वेळावेळी काढून घेतल्याचा तक्रारअर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता़ बंधारे ग्रामपंचायतीचे खाते असलेल्या नवापुर सेंट्रल बँक आणि युनियन बँक चिंचपाडा येथून हे पैसे काढण्यात आल्याचे देण्यात आलेल्या अर्जात म्हटले होत़े त्यावर  कारवाई करत न्यायालयाने सोमवारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होत़े गेल्या काही महिन्यांपासून चौघांनी अपहार केल्याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता़ याबाबत नरपत गोविंद वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच हेमा पाडवी, ग्रामसेवक शिवाजी गावीत, सरला वसावे आणि नानसिंग वसावे यांच्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक डी़एस़शिंपी करत आहेत़