शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट कमिटमेंटमुळे गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 11:41 IST

पोलीस अधीक्षक : आज वर्षपूर्तीनिमित्त उत्कृष्ट काम करणा:यांचा सन्मान

नंदुरबार : वर्षभर राबविण्यात आलेल्या कोर्ट कमिटमेंट प्रोगाममुळे न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले. या कमिटमेंट प्रोगामच्या वर्षपुर्तीनिमित्ताने गुरुवारी उत्कृष्ट कामगिरी करणा:या अधिकारी व कर्मचा:यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.गेल्या जानेवारी महिन्यापासून पाच कलमी कार्यक्रमाअंतर्गत कोर्ट कमिटमेंट प्रोगाम सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्रुटी रहित तपास करण्यावर भर देवून विविध गुन्ह्यांचा तपास वेळेत पुर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे, न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर साक्षीदार, आरोपी यांचा समन्स वॉरंटची बजावणी वेळेत करणे अशा बाबींसंदर्भात हा उपक्रम आहे. यातील पाच कलमांमध्ये उत्कृष्ट व वेळेत तपास करणे, समन्स वॉरंट बजावणीबाबत पैरवी अधिकारी व सरकारी वकील यांनी दररोज आढावा घेणे. पोलीस व सरकारी वकील यांनी साक्षी अगोदर समन्वय साधणे. पोलीस साक्षीदार व तपास अधिकारी यांची दररोज मुलाखत घेणे आणि उत्कृष्ट तपास व गुन्हे शाबीततीकरीता प्रोत्साहनपर बक्षीस तसेच प्रमाणपत्र वाटप करणे आदींचा त्यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्हे शाबीतीचे प्रमाण वाढण्यास व आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाली आहे. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2018 दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत समन्स व वॉरंट बजावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अपेक्षीत अशी फलश्रुती कोर्ट कमिटमेंट प्रोगाममुळे प्राप्त झाली आहे. 3 जानेवारी रोजी वर्षपूर्ती सोहळा जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सर्व पोलीस अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वर्षभरात सवरेत्कृष्ट कामगिरी करणा:या पोलीस अधिकार, कर्मचारी यांचा गौरव करण्यात येणार आहे. याचवेळी फेज दोनची सुरुवात व अंमलबजावणी करण्यात येणार   आहे.