शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल कामगार आढळून येतात. अशा बालकांच्या सुटकेसाठी बालदिनानिमित्त महिनाभरात जिल्ह्यात प्रत्येक कामाच्या ¨ठकाणी अचानक धाड टाकण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंडळामार्फत सांगण्यात आले. जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने, बाधकाम व विटभट्टी अशा ठिकाणी बालकामगार दिसून येतात. बालकामगार ठेवणे ही बाब कायद्याने गुन्हा असतानाही काही मालक, ठेकेदारांमार्फत कमी वयातील मुलांकडून काम करुन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी बालदिनानिमित्त विशेष मोहिम आखण्यात येणार आहे. महिनाभरात मालक व पालकांमध्ये जनजागृती करीत बालकांना कामावर न ठेवण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे. या अभियानाला 7 नोव्हेंबरपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. परंतु शाळांना  सुटय़ा असल्यामुळे शाळा वगळता अन्य ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे, त्याद्वारे बालकामगार मुक्तीसाठी मालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात  येणार असल्याचे कामगार मंडळ अधिकारी के.के.जोशी यांनी सांगितले. टप्प्या-टप्प्याने रेल्वे स्थानके, बसस्थानके व शाळांध्येही हे अभियान राबविण्यात येणार आहे. शिवाय  7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत दोषी आढळून येणारे ठेकेदार व मालकांवर कायदेशिर कायरवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. याबाबत अधिकारी व कर्मचा:यांमध्येही जनजागृती होणार आहे.

रोजगारासाठी स्थलांतर करणा:या पालकांसोबत कुटुंबातील सहा ते 14 वर्ष वयोगटातील मुलेही स्थलांतरीत होतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सव्र्हे करण्यात आला. या सव्र्हेमध्ये जिल्ह्यात 199 शाळाबाह्य मुलेही आढळऊन आले. त्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 163, अक्कलकुवा तालुक्यात 33 तळोदा तालुक्यात दोन व शहादा तालुक्यात एक अशी संख्या आहे. या बालकांच्या विकासासाठी प्रशासन कुठली भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.