शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी धरणाचे पाणी शेतात शिरल्याने कमरेएवढ्या पाण्यात कापूस वेचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब झाला आहे. हे पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांवर कमरेएवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली आहे. याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने गोदीपूर व नवलपूर शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारुन जावे लागत आहे.ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणालगत आहे. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणातील पाणी  शेतशिवारात येऊन पाणी साचून पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी लिमजी छगन पाटील यांचे सुसरी धरणलगत गोदीपूर शिवारात शेती आहे. त्यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती. सुसरी धरणाचे पाणी थेट शेतात साचल्याने कापूस पिकाचे नुकसान होत आहे. तर काही प्रमाणात हाताशी आलेल्या कापसाची वेचणी स्वतः शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यात जीव धोक्यात टाकून करावी लागत आहे.

१२ वर्षापासूनच्या मागणीकडे दुर्लक्षसुसरी धरणाच्या शेजारून शेतात जाण्यासाठी रस्ता होता. परंतु सुसरी धरण बनल्यापासून सुसरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली तर रस्ताच गायब होत असल्याने शेतकऱ्यांना चार किलोमीटरचा फेरा मारत जावे लागते. त्यामुळे हा रस्ता सुसरी धरणापासून लांब करण्याची मागणी गेल्या १० ते १२ वर्षापासून होत असून याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसान भरपाईची मागणीधरणाचे पाणी शेतात साचून शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही शेतकऱ्यांना सुसरी धरणात शेती गेल्याने त्यांना त्याचा मोबदला काही प्रमाणात मिळाला तर काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पेरणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचून नुकसान होते. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.