शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

कोरोनासोबत डेंग्यूलाही सामोरे जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आधीच कोरोनाचा कहर, त्यात पावसाळ्यात डेंग्यूची साथ नको म्हणून हिवताप विभाग सरसावला आहे. यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आधीच कोरोनाचा कहर, त्यात पावसाळ्यात डेंग्यूची साथ नको म्हणून हिवताप विभाग सरसावला आहे. यासाठी आतापासूनच घरोघरी सर्व्हेक्षण करून रक्तजल नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डेंग्यूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता आले होते.डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी डासांची उत्पत्ती ठिकाणी परिसरात निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी आर.बी.ढोले यांनी केले आहे.किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात २०१९ मध्ये एकूण २००२ रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १५३ डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील २९८ असे ४५१ रुग्ण एन.एस.१ चे आढळून आले आहेत.एप्रिल २०२० मध्ये एकूण सरकारी रुग्णालयातील १६३ रक्त जल नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात ६ डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील ६ असे १२ रुग्ण एन.एस.१ चे आढळून आले आहेत.मागील दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस या डासांच्या चावण्यापासून होत असल्याने तसेच या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाºया मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत.अंगभर कपडे घालावेत, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, डास पळवून लावणा?्या क्रीम व कॉईल चा वापर करावा जेणे करुन डासोत्पत्तीला व आजार प्रसाराला प्रतिबंध होईल व डेंग्यू आजाराला टाळता येईल. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायईकांनी आपल्या रुग्णालयांमध्ये डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे डेंग्यू दुषित आढळून आलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यू आजाराच्या निदानाकरीता सेन्टीनल सेन्टर येथे पाठविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही ढोले यांनी केले आहे.डेंग्यू हा आजार नोटिफायबल आजार असल्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व खाजगी प्रयोगशाळांनी रुग्णालयामध्ये डेंग्यू दुषित रुग्ण आढळून आल्यास त्याची सूचना त्वरीत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयास द्यावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी फक्त इलायझा टेस्ट असून त्याची टेस्ट जिल्हामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेन्टर येथे कार्यान्वित केलेली आहे.