भारतीय जनता पार्टीचे सेवा दिवस निमित्ताने कोरोना योद्धा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सफाई कामगारांनी जीवाची पर्वा न करता कोरोनाकाळात नवापूर शहराची काळजी घेतली. सफाई कामगारांची भूमिका महत्त्वाची आहे यासाठी भाजपकडून सेवा दिवस निमित्ताने कोरोना योद्धा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. घरातून कोणी बाहेर निघत नव्हते अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी संकटातून नवापूर शहराला वाचले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची अडचणी दूर केल्या जातील असे मत भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी व्यक्त केले.
यावेळी राजू गावित, एजाज शेख, कमलेश छत्रीवाला, प्रणव सोनार, नगरसेवक महेंद्र दुसाने, नीलेश प्रजापत, जाकीर पठाण, दुर्गा वसावे, हेमंत जाधव, स्वप्निल मिस्त्री, शाहरूख खाटिक, सौरव सोनार, भाविन राणा, राजेश सोनी, गोपी सैन, हेमंत शर्मा उपस्थित होते. यादरम्यान नवापूर नगरपालिकेतील ४२ कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. राजू गावीत, एजाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कुणाल दुसाने, आभार एजाज शेख यांनी आभार मानले.