शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कोरोना चाचण्या वेटींगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रॅपीड अँटीजन टेस्टची स्थानिक ठिकाणी सोय करून देखील जिल्ह्यात कोरोना स्वॅब अहवालांची वेटींग वाढतच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रॅपीड अँटीजन टेस्टची स्थानिक ठिकाणी सोय करून देखील जिल्ह्यात कोरोना स्वॅब अहवालांची वेटींग वाढतच चालली आहे. शनिवारी सकाळपर्यंत तब्बल ४९० अहवाल प्रलंबीत होते. शनिवारी सायंकाळपर्यंत वेटींग ५२८ पर्यंत आली होती. एवढ्या मोठ्या संख्येने अहवाल प्रलंबीत राहत असल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे.अहवाल येत नसल्याने अनेक संशयीत खुलेपणाने बाहेर फिरत असल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना धोका वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारात नियोजित असलेली अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करावी अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वॅब संकलन देखील वाढविण्यात आले आहे. परंतु चाचणी अहवालच लवकरच येत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी जवळपास ४९० वेटींग होती. ती दुपारपर्यंत ५२८ वर आली होती. सायंकाळी उशीरापर्यंत काही अहवाल येण्याची शक्यता होती.स्वॅब वाढले, चाचण्या कमीजिल्ह्यात विशेषत: नंदुरबार व शहादा येथे स्वॅब संकलन वाढले आहे. त्यासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली आहे. नंदुरबारात दोन फिरते पथक कार्यान्वीत करून ते स्वॅब संकलन करीत आहेत. याशिवाय नंदुरबार जिल्हा रुग्णालय आणि शहादा येथील कोविड कक्षात देखील स्वॅब संकलन केंद्र सुरू आहे. येत्या काळात नंदुरबारात आणखी दोन ठिकाणी आणि तळोदा व नवापूर येथे स्वॅब संकलनाची सोय करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.स्वॅब संकलन वाढले असले तरी चाचण्या मात्र वेळेवर होत नसल्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला आहे.वेगवेगळया ठिकाणी उपचारआजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १४ वैद्यकीय अधिकारी, ३३ परिचारिका, २ इतर अधिकारी आणि २० इतर कर्मचारी रुग्णांना २४ तास सेवा देत आहेत. काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होवूनही रुग्णसेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. बरे होणाºया रुग्णांनी उत्स्फुर्तपणे संकटाच्या परिस्थितीत सेवा देणाºया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली आहे.जिल्हा प्रशासनातर्फे रुग्णालयात सर्व प्रकारची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्यादृष्टीने त्यांना उपचार व आहार देण्यात येत आहे. त्यामुळे बरे होणाºयांची संख्या सातत्याने वाढते आहे. रक्तदाब, मधुमेह आदी आजार असणारे आणि वृद्ध रुग्णदेखील वेळीच तपासणी झाल्याने बरे झाले आहेत.१३५ आॅक्सीजन बेड : जिल्हा शासकीय रुग्णालयात ३८ व्हेंटीलेटर्स व ३० आॅक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात त्यात आणखी १३५ आॅक्सिजन बेड्सची भर पडणार आहे. शिवाय कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी शासन स्तरावरदेखील प्रयत्न करीत आहेत. वेळेवर आजाराचे निदान झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढू शकेल. त्यामुळे शहरी भागात मोबाईल स्वॅब टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.नागरिकांनी ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. आजार उपचारानंतर बरा होत असल्याने न घाबरता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.