शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

होलिकोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीशी असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, ...

यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीशी असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपरिक वाद्ये अशा अनेक आदिवासींच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतात आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते. सर्वाना एकत्रित करून समूहजीवनाचे धडे देते.

या वेळी ‘होळी म्हणजेच आदिवासी आणि आदिवासी म्हणजेच होळी’ हे समीकरण बनते आणि आदिम अस्तीत्व-प्रतीकांची जीवंत अनुभूती घेता येते. मात्र सातपुड्यातील आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक होळीवर प्रथमच काळाने घाला घातला असून, कोरोना या महाभयंकर विषाणुने संपूर्ण जग हादरवून सोडले आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने घालून दिलेल्या काही नियमांना बघता यावर्षी सातपुड्यातील आदिवासी समाजाची दिवाळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या होळी महोत्सवावर यंदा ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीवर कोरोनाचे संकट असून, सातपुड्यातील ढोल-ताशांचा गजर होलिकोत्सवामुळे पूर्ण पहाडात दूमदूमत होता. मात्र यावर्षी आदिवासींचा नशिबीहे सर्व नसल्याचे दिसत असून। याला ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे.

जशी वसंताची चैत्रपालवी नव्या सुरूवातीची चाहूल घेऊन येते, तशी होळी आदिवासींच्या जीवनात नवचैतन्य घेऊन येते. होलिकोत्सव उत्साह उधळायला, मनसोक्त नाचायला, गायला लावते. खरतर होळी आदिवासींच्या दु:खावर पांघरूण घालते. दुःख विसरून आनंदाचा शोध घ्यायला लावते. नवनिर्मितीची प्रेरणा देते. दुःख-गरिबीतही आनंदाने नाचता येते. होळी अशीच सहजपणे सर्वाना सामावून घेते. नवीन उत्साह व उभारी देते. ढोलच्या तालावर एकत्र येत नाचू लागतात. एकमेकांशी एकरूप होऊन होळी साजरी केली जाते.

दरवर्षी उत्साहात साजरा होणारी होळी माणसाला माणूस बनवते, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन. आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असं सर्वच देते, मायेच्या आशिर्वादासह आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. मात्र या सर्वांवर यंदा कोरोनाने पाणी फिरवलं असेच म्हणावं लागेल.