शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले, परंतु ऑक्सिजन सिलिंडर संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:29 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोरोना रुग्ण संख्या घटल्याने ऑक्सीजनचीही मागणी घटली आहे. दररोज किमान १२० ते १४० ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोरोना रुग्ण संख्या घटल्याने ऑक्सीजनचीही मागणी घटली आहे. दररोज किमान १२० ते १४० जम्बो सिलिंडर लागत होते तेथे आता केवळ ७० सिलींडर लागत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय तीन तर खाजगी चार कोरोना उपचार सेंटर बंद झाले आहेत. सणासुदीच्या काळातच कोरोना रुग्णसंख्या घटल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना कायम ठेवल्या आहेत. शिवाय ऐनवेळी कोरोना सेंटर सुरू करण्याची वेळ आली तर त्यासाठीही सज्जता ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना उपचार कक्षांमध्ये देखील रुग्ण कमी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे ऑक्सीजन सिलेंडरची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढली आहे. फक्त कोविड रुग्णांसाठी एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात तब्बल ७,२३७ जम्बो ऑक्सीजन सिलिंडर लागले आहेत.  सुरुवातीच्या काळात जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात ऑक्सीजन बेडची संख्या कमी होती. त्यामुळे सिलिंडरही कमी लागत      होते.   जुलै महिन्यापासून ऑक्सीजन बेडची संख्या वाढल्याने सिलिंडरही जास्त लागत आहेत. त्यामुळे जुलै ते आऑक्टोबर या चार महिन्यात दररोज हजार पेक्षा अधीक सिलिंडर लागत आहेत. ऑक्टोबर महिन्यात तर तब्बल तीन हजारापेक्षा अधीक सिलिंडर लागले आहेत. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक तेवढ्या ऑक्सीजन  सिलिंडरचे नियोजन करण्यात येत आहे.  लवकरच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वीत होत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात आवश्यक तेवढे     ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.के.डी.सातपुते यांनी दिली. 

स्वॅब संकलन झाले कमीगेल्या महिन्याभरापासून स्वॅब संकलन कमी झाले आहे. त्यामुळे चाचण्याही कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम रूग्णसंख्येवर दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जणांची कोविड टेस्ट पाॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसात १०० पेक्षा कमी जण पाॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरी लाट येते किंवा नाही, आली तर किती रुग्ण आढळतील याकडे लक्ष लागून आहे.