शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून आलेल्या एस.टी.कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मुंबई बेस्टला सेवा दहा दिवसांसाठी गेलेल्या नंदुरबार आगारातील एसटी बस चालक व वाहक परत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मुंबई बेस्टला सेवा दहा दिवसांसाठी गेलेल्या नंदुरबार आगारातील एसटी बस चालक व वाहक परत आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी हिंदु सेवा सहाय्य समितीने केली होती. सदरची मागणी दखल घेत नंदुरबार एसटी महामंडळ आगाराने मुंबई येथून परत आलेल्या ६२ कर्मचार्‍यांची कोविड १९ ची तपासणी केली आहे. या तपासणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समिती आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांचे सहकार्य लाभले.नंदुरबार आगारातील एसटी बस चालक व वाहक हे १० दिवसांसाठी मुंबई येथे बेस्टला सेवा देण्यासाठी   गेले होते. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने खबरदारी म्हणून सेवा बजवून परत आलेल्या नंदुरबार आगारातील वाहक व चालकांची कोरोना तपासणी करण्याची मागणी नंदुरबार येथील हिंदु सेवा सहाय्य समितीने जिल्हाधिकारी आणि नंदुरबार आगाराचे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत परिवहन मंडळाच्या नंदुरबार आगाराने दि.८ नोव्हेंबर रोजी हिंदु सेवा सहाय्य समितीला पत्र पाठवून मुंबई बेस्टवरील कामगिरी करून परत आलेल्या कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानुसार आज दि.९ नोव्हेंबर रोजी नंदुरबार आगारात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खबरदारी म्हणून एकूण ६२ चालक व वाहक कर्मचार्‍यांचे स्वॅब घेण्यात आले. या तपासणीसाठी नंदुरबार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्यसेवक योगेश वसावे, हिना वळवी, रविंद्र बोरस यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी नंदुरबारचे आगार व्यवस्थापक मनोज पवार यांनी हिंदु सेवा सहाय्य समितीचे पदाधिकारी आणि तालुका आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार केला. कार्यक्रम  यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे पदाधिकारी डॉ.नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी, शेखर कुलकर्णी आणि बस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.