शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उपलब्ध औषधांनीच करता येईल कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:06 IST

संडे स्पेशल मुलाखत सध्या आहे त्या उपचार पद्धतीनेच कोरोनाचा सामना करता येईल. रसायनशास्त्राचा धातू धनभारीत पद्धतीचा अवलंब करता येईल- इंदिरा राजपू

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कभारतातच उपलब्ध असणाऱ्या मान्यताप्राप्त औषधांनी कोरोना आटोक्यात येवू शकतो असा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ इंदिरा जितेंद्रसिंह राजपूत यांनी केला आहे. त्यांचा प्रबंध इंटरनॅशनल इंटरडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलने आॅनलाईन प्रसिद्ध केला आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद.कोरोना विषाणूचे कवच भेदले का जात नाही?सध्या भारतात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी फक्त प्रतिविषाणू औषध (अँटीव्हायरल) द्वारे कोरोना आजारावर उपचार करण्यात येतात. सदर उपचारामुळे कोरोना विषाणूचे कवच भेदण्यात मयार्दा येतांना दिसत आहेत. प्रबंधात कोरोना विषाणूच्या मेदाच्या कवचावर काही विशिष्ठ औषधांची अभिक्रिया करुन मेदाचे कवच तोडता येवू शकते. कवच भेदल्यानंतर प्रथिने शिल्लक राहतात. या प्रथिनांवर अँटीव्हायरल औषधे परिणामकारक ठरु शकतील. कोरोनाच्या मेदाचे कवच भेदण्यासाठी जी औषधे वापरली जात आहेत त्यासोबत प्रतिविषाणू औषधे (अ‍ॅन्टीव्हायरल ड्रग) वापरली गेली तर कोविड-१९ वर फायदेशीर ठरु शकते.आपल्याकडे या औषधी उपलब्ध आहेत का?सर्व औषधे भारतात आधीच उपलब्ध असून मान्यताप्राप्त आणि सुरक्षीत व त्यासोबत सहज उपलब्ध असणारे आहेत. या उपचार पध्दतीत कोणत्याही नवीन औषधांचा पर्याय सुचविण्यात आलेला नाही. तर प्रतिजैविक सोबत द्यावयाची औषधांचा संयोग कसा असावा यावर भर देण्यात आला आहे.प्रबंधाला मानांकन मिळाले का?इंटरनॅशनल इंटरडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या १२ मे रोजी आॅनलाईन प्रसिध्द झालेल्या ताज्या आवृत्तीत शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे. सदर जर्नलला ६.३ इतके मानांकन प्राप्त आहे.

साधारणत: अशा संशोधनासाठी दिड ते अडीच वर्षाचा काळ लागतो. मात्र कोविड-१९ ची भयावहता आणि जगाला घातलेला विळखा या पार्श्वभूमीवर इंदिरा राजपूत यांनी महिनाभराच्या अभ्यासातून विस्तृत प्रबंध सादर केला आहे.

आणखी संशोधन करणार...राजपूत या आॅरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. झाल्या असून डीएमएलटी देखील केले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शोधनिबंध आंतरराष्टÑीय स्तरावर प्रसिद्ध होताच अनेक अभ्यासकांनी त्यांच्याशी संवाद साधून या उपचार पद्धतीबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून नंदुरबारचे नाव आंतरराष्टÑीय पातळीवर झळकले आहे. येथेच न थांबता आपण आणखी संशोधन करणार असून या उपचार पद्धतीला पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.