शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा तलाठी संघाचे प्रकाशा येथे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : नंदुरबार जिल्हा तलाठी संघाचे चौथे पंचवार्षिक अधिवेशन शनिवारी येथे झाले. या अधिवेशनात तलाठी संघाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : नंदुरबार जिल्हा तलाठी संघाचे चौथे पंचवार्षिक अधिवेशन शनिवारी येथे झाले. या अधिवेशनात तलाठी संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत जिल्हाधिकारी बालाजी मुंजुळे यांच्या हस्ते अधिवेशनात उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, प्रांतधिकारी  लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, तलाठी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष गौसमहमद लांडगे, जिल्हाध्यक्ष शिरीषचंद्र परदेशी, जे.डी. वसावे, पी.डी. निकम उपस्थित होते. या वेळी ज्ञानदेव डूबल यांनी तलाठय़ांना येणा:या अडचणी मांडल्या. त्यात तलाठय़ांकडे असलेले लॅपटॉप जुने झाले असून ते नवीन मिळावेत अशी मागणी केली. तसेच सेवापुस्तिकाही अद्ययावत करणे, सातबारा संगणकीकरणाला अनेक अडचणी येतात, सॅटेलाईटची अडचण येते. त्यामुळे शेतकरी तलाठींवर नाराज होतात. तलाठय़ांकडे असलेला अतिरिक्त भारामुळे दहा गावांना त्यांना जावे लागते. त्यामुळे एका ठिकाणी न थांबल्याने शेतकरी नाराज होतात. तसेच तलाठय़ांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी तलाठय़ांच्या वतीने जिल्हाधिका:यांकडे केली. आलेल्या शेतक:यांना आपल्या वडिलांप्रमाणे वागणूक द्या, त्यांना सन्मानाने बसवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहनही डूबल यांनी तलाठय़ांना केले. जिल्हाधिकारी मुंजुळे म्हणाले की, तलाठी बदली आणि प्रमोशनचा प्रश्न आधीच मार्गी लावला आहे. नवीन लॅपटॉपसाठी लवकरच तरतूद करण्यात येईल व सातबारा संगणकीकरणासाठी अडचणी येणार नाहीत यासाठीही प्रय} करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शिरीषचंद्र परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी बीडकर यांनी तर आभार के.डी. निकम मानले. कार्यक्रमासाठी डी.एम. चौधरी, जिजाबराव पाटील, चव्हाण  आदींनी परिश्रम घेतले.या अधिवेशनात जिल्हा तलाठी संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष शिरीषचंद्र गोटू परदेशी (शहादा), कार्याध्यक्ष समाधान पाटील (तळोदा),       उपाध्यक्ष पी.टी. खंडारे (नंदुरबार), सरचिटणीस पी.डी. निकम (शहादा),  अपर चिटणीस प्रदीप पाटील  (शहादा), कोषाध्यक्ष जी.बी. कानडे (नंदुरबार), हिशोब तपासणीस  सी.टी. नाईक (नवापूर), सल्लगार  बी.ओ. पाटील (शहादा), संघटक   सी.टी. चंद्रात्रे (अक्कलकुवा),  विभागीय उपाध्यक्ष व्ही.एम. गावीत (नवापूर), विलास चौरे (तळोदा), के.जे. पावरा (धडगाव), महिला प्रतिनिधी सुरेखा राठोड (शहादा), आशा देवांग (शहादा), निमंत्रीत सदस्य एस.एस. तडवी (अक्कलकुवा), आर.डी. गांगुर्डे (नंदुरबार), व्ही.डी.सावळे (शहादा) यांचा समावेश आहे.