शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात कंत्राटी आरोग्य कर्मचा:यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:12 IST

आरोग्य सेवेवर परिणाम : साडेनऊशे कर्मचारी सहभागी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचा:यांनी विविध मागण्यांसाठी बुधवार, 11 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास 950 कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे.याबाबत राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान, अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी कर्मचा:यांची पुनर्रनियुक्ती करतांना यापुढे केवळ सहा महिन्यासाठीच नियुक्ती ठेवण्याचा नवीन फतवा आरोग्य सेवा संचालनालयाने काढला आहे. पुनर्रनियुक्ती देण्याकरीता कामावर आधारीत मार्क सिस्टिम तयार केली आहे. या बदललेल्या पुनर्रनियुक्ती प्रक्रियेमुळे मोठय़ा प्रमाणावर कंत्राटी कर्मचा:यांची पिळवणूक होणार आहे. कामावर आधारीत मार्क सिस्टिम जाचक असून जे काम कंत्राटी कर्मचा:यांच्या जॉबचार्टमध्ये नाही त्यास त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.पुनर्रनियुक्ती प्रक्रियेमध्ये झालेला अन्यायकारक बदल तसेच संघटनेच्या विविध प्रलंबीत मागण्यांकरीता संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा देखील संघटनेतर्फे करण्यात आला आहे.