शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील लघुप्रकल्पांमधील पाणीगळती सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:54 IST

तळोदा तालुका : दिवसेंदिवस पाण्याची पातळी होतेय कमी, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : तळोदा तालुक्यातील रोझवा पाडळपूर, धनपूर, गाढवली, सिंगसपूर आदी लघुप्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीगळती होत आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आह़े संबंधित लघुप्रकल्पांव्दारे बहुसंख्य गावांना पाण्याचा पुरवठा होत असतो़ परंतु बहुतेक लघुप्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे पाणी वाहून जात असल्याने लघुप्रकल्पांमधील पाणीपातळी खालावत आह़े धनपूर लघुप्रकल्पाला वगळता रोझवा, पाडळपूर, गाढवली, सिंगसपूर या लघुप्रकल्पांच्या दुरुस्तीविषयी गांभीर्याने घेणे महत्वाचे आह़े या चारही प्रकल्पांचे गेट तसेच पाटचारीची दुरुस्ती वेळोवेळी होत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत़ रोझवा लघुप्रकल्पाची समस्या तर अत्यंत वाईट असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े सांडव्याची दगडी भिंत दोन वर्षापासून खड्डेमय झाल्याने भिंतीला मोठमोठी छिद्रे आहेत़ त्या छिद्रांमधून दररोज शेकडो लीटर पाणी वाहून जात असत़े त्यामुळे पावसाळ्यात लघुप्रकल्प दुथळीभरुन वाहत असले तरी पाण्याच्या गळतीमुळे त्यातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे सांगण्यात येत आह़े परिसरातील शेतक:यांनी याबाबत वारंवार संबंधित विभागाच्या अधिका:यांकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत़ परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े दरम्यान, हक्काचे पाणी दररोज विनाकारण वाहून जात असल्याने शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत            आह़े शासनाकडून जलयुक्त शिवार तसेच पाणीदार गाव निर्माण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात़ त्याच बरोबर पाण्याचे सिंचन व्हावे यासाठीही ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत असत़े परंतु अशा प्रकारे लघुप्रकल्पांमधून पाणी वाहून जात असल्याने प्रशासकीय कामकाजात विरोधाभास दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, रोझवा, पाडळपूर, लघुप्रकल्पांची गेट, पाटचारी दुरुस्ती झाल्यास सिंचनाखालील क्षेत्रामध्येही वाढ होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े पाणी गळतीमुळे आतार्पयत हजारो लीटर पाणी वाहून गेले आह़े त्यामुळे समाधानकारक पाऊस होऊनसुध्दा पावसाळ्यात पाण्याचे सिंचन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े पर्यायाने उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े पाणी गळती थांबल्यास पाण्याचा साठा जास्त काळ शिल्लक राहण्यास मदत होणार आह़े गाळ वाहतुकीस परवानगी द्यायला हवीरोझवा, पाडळपूर, लघूप्रकल्पात सुपीक गाळ ब:यापैकी साचला असल्याने दरवर्षी शेतकरी स्वताच्या खर्चाने गाळ वाहून नेत असतात़ लघुप्रकल्पाच्या खोलीकरणालाही मदत होत असत़े त्यामुळे संबंधित विभागाने गाळ वाहतुकीला परवानगी देऊन प्रकल्पांचे खोलीकरणास सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े