येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथील पाण्याचे नमुने तपासले असता पाणी दूषित असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावस्कर यांनी सांगितले. त्यानंतर ज्या टाकीतून या घरांना पाणी येते, त्या नागबरडा येथील पाण्याच्या टाकीमधील पाण्याचे नमुने तपासले असता ते मात्र निगेटिव्ह आले आहेत. म्हणून प्रकाशा ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून आंबेडकरनगरातील त्या गल्लीतील पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइन बंद केली आहे, जेणेकरून दूषित पाणीपुरवठा होणार नाही. ज्या घरांना पाणी दूषित येत आहे, त्या गल्लीतील पाइपलाइन खोदून पाहिली असता कुठे लिकेज आढळून आले नाही, असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले. मात्र, तरीही जुनी पाइपलाइन बंद केली आहे. त्या ठिकाणी नवीन पाइपलाइनद्वारे आता पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनी दिली. नळांना दूषित पाणी येत असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य छोटू सामुद्रे यांनी दिली होती.
प्रकाशा गावात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST