शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील नऊ गावांना दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:04 IST

हितेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रूपये खर्च केले ...

हितेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रूपये खर्च केले जात असले तरी अद्यापही अनेक गावात गावांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. शहादा तालुक्यात १५० ग्रामपंचायती आहेत. त्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची तपासणी केली असता १४१ ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाणी असल्याने हिरवे कार्ड तर नऊ गावातील पिण्याचे पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आल्याने या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. सुदैवाने तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीकडे लाल कार्ड नाही. दूषित पाणीपुरवठा करणाºया ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाºया स्रोतांचे पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. हा अहवाल नुकताच आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १५० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त आहे. तर १४१ ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे अहवालावरून निष्पन्न झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीचे आजार पसरू नये याकरिता ग्रामपंचायतींकडून टीसीएल पावडरचा वापर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळण्यासाठी फिल्टरचे पाणी पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे तर काही ग्रामस्थांची परिस्थिती पाहता पाण्याच्या जार विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नसून, ग्रामपंचायतीच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायतीकडून होणाºया दूषित पाणीपुरवठ्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांच्या नशिबी आजारपण येत असते. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावातील पिण्याच्या पाण्यात टीसीएल पावडर वापरत नसल्याचा प्रकार अनेकदा समोर येत असतो. आजही अनेक ठिकाणी नियमित टीसीएल पावडरचा वापर होत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढण्याची अधीक शक्यता असते. त्यामुळे साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यताही वाढते. या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी दूषित पाण्याची समस्या मिटलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोका कायम असतो.संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्याचे नमुने घेऊन पाण्याचा दर्जा ठरविण्यात येतो. त्यात पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रामपंचायतीला लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे त्या ग्रामपंचायतीला लाल, कमी दुषित पाण्याचा पुरवठा करणाºया ग्रामपंचायतीला पिवळे तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाºया ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड देण्यात येते.शहादा तालुक्यातील काहाटूळ, धांद्रे बुद्रूक, उभादगड, चिरखान, शहाणा, वडगाव, कोळपांढरी, टेंभली (आसूस), कुरंगी या नऊ ग्रामपंचायतींकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.