शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

रेल्वेकडून संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:11 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या सिन्नर फाटा बाजूने ५१० मीटर रुंदीची १० फूट उंचीची भिंत बांधण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या सिन्नर फाटा बाजूने ५१० मीटर रुंदीची १० फूट उंचीची भिंत बांधण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वे कॉलनी परिसरातून येणे-जाणे बंद होणार आहे.  नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथील रेल्वेच्या रुग्णालयापासून १० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयापासून रेल्वेची हद्द असलेल्या रेल्वे कॉलनीला वळसा घालून सिन्नर फाटा बाजूकडील नवीन तिकीटघरापर्यंत संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. ५१० मीटर रुंदीची भिंत बांधण्यात येत असून, ३२० मीटर रुंद भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. सिन्नर फाटा बाजूकडून रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्यांना संरक्षक भिंतीमुळे वळसा घालून यावे लागणार आहे. यामुळे सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, गोदरेजवाडी भागातील रहिवाशांची गैरसोय होणार आहे.अखंड भिंत उभारण्यास विरोधरेल्वे प्रशासन स्वत:च्या जागेत सुरक्षितेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारत असल्याने त्या भागातील रहिवाशांना नाशिकरोडला येण्यासाठी देवी चौक सिन्नर फाटा येथील जुना पादचारी पूल किंवा सिन्नर फाटा मारुती मंदिराकडून रस्ता मार्गे यावे लागणार आहे. त्या भागातील रहिवाशांनी प्रारंभी अखंड भिंत उभारण्यास विरोध केला होता. किंबहुना येण्या-जाण्यासाठी थोडी जागा सोडण्याची मागणी केली होती. मात्र सुरक्षितेतमुळे रेल्वे प्रशासनाकडून अखंड संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे सिन्नर फाटा रेल्वे कॉलनीलादेखील सुरक्षितता प्राप्त होणार आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक