शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात चैतन्य, पण काळजी घेणेही गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:03 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दिवाळी पर्वानिमित्त शुक्रवारी बाजारता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे बाजारात चैतन्य पसरले ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  दिवाळी पर्वानिमित्त शुक्रवारी बाजारता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे बाजारात चैतन्य पसरले आहे. कोरोना व लाॉकडाऊनंतर प्रथमच एवढी गर्दी आणि उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसतांना नागरिकांची बाजारातील गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचा अभाव मात्र चिंता निर्माण करणारा ठरत आहे. दिवाळीचा उत्साह व चैतन्य जिल्हाभरात दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शुक्रवारी तर गर्दीने उच्चांक मोडला. सकाळी नऊ वाजेपासूनच बाजारात गर्दी झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत ती कायम होती. रेडीमेड कपडे, हॅण्डलूम, इलेक्ट्राॉनिक वस्तू, सराफा दुकान येथे गर्दी दिसून येत होती. अनेक दुकानांमध्ये ग्राहकांना वेटींग करावी लागत होते. विशषेत: कपड्यांचा दुकानात हे चित्र होते. शनिवारी लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तू अर्थात झेंडूची फुले, केरसूनी, लाह्या, बत्तासे यासह मिठाई खरेदीसाठी गर्दी झाली होती. झेंडूची फुले यंदा बाजारात कमी होती. अतीवृष्टीमुळे यंदा झेंडूची शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा झेंडू चांगलाच भाव खाऊन जात आहे. दसऱ्यानंतर आता दिवाळीला देखील झेंडूचे भाव चढतेच होते. शुक्रवारी तब्बल १७० ते २०० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली. भाव जास्त असला तरी पुजेसाठी तोरण बांधण्यासाठी झेंडूची फुले खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. कोरोनानंतर प्रथमच बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी व त्यातून सोशल डिस्टन्सिंगचा उडणारा बोजवारा, अनेकांच्या तोंडाला मास्क नसणे यामुळे अनेकजण कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सण, उत्सवाच्या आनंदात कोरोनाला विसरू नका, प्रत्येकाने काळजी घ्या असे आवाहनही करण्यात आले.