शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी नंदुरबारमधून क़ेसी़पाडवी व भरत गावीतांचे नाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:04 IST

मुंबईत बैठक : संभाव्य उमेदवारीसाठी नावे

नंदुरबार : लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे नंदुरबार मतदारसंघाकरिता आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत या दोन उमेदवारांची नावे आज पक्षाकडे देण्यात आले आह़े मुंबईत झालेल्या बैठकीत ही नावे देण्यात आली़ लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांतर्फे निवडणूक तयारीला जोर आला आह़े विद्यमान खासदार डॉ़ हीना गावीत ह्या भाजपतर्फेच पुन्हा उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहिर केले आह़े यापाश्र्वभूमीवर काँग्रेसतर्फे उमेदवार कोण, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता लागून होती़ गेल्या महिन्याभरापासून नंदुरबार मतदारसंघावर राष्ट्रवादीनेही दावा केल्याने याठिकाणी काँग्रेस की राष्ट्रवादी असाही प्रश्न चर्चेत होता़ मात्र येथील जागा काँग्रेसलाच मिळाली आह़े या पाश्र्वभूमीवर रविवारी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबार मतदार संघातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती़ यावेळी आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अॅड़क़ेसी़पाडवी, आमदार डी़एस़अहिरे, आमदार काशिराम पावरा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत हे उपस्थित होत़े यावेळी सर्वानुमते संभाव्य उमेदवारीसाठी काँग्रेसतर्फे आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी व भरत गावीत या दोघांची नावे देण्यात आली आहेत़