शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

Vidhan Sabha 2019: काँग्रेसने ऐनवेळी उमेवार बदलल्याने लढतीत आले टि¦स्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:03 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक व्टिस्ट निर्माण होऊन भाजप ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक व्टिस्ट निर्माण होऊन भाजप आमदाराने थेट राजीनामा देत काँग्रेसकडून उमेदवारी मिळविल्याने नंदुरबारची लढत आता रंगतदार ठरली आहे. गेल्या पाच वर्षात एकाच पक्षात सोबत काम केलेले आणि सोबत आमदार राहिलेल्या दोन उमेदवारांमध्ये होणारी ही लढत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. नंदुरबार मतदारसंघात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे विरोधक व काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा देत थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील निवडणूक युतीसाठी पर्यायाने डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासाठी सोयीची ठरल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु शहाद्याचे भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांचे तिकीट कापल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लागलीच त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. काँग्रेसने आधी या ठिकाणी दुसरा उमेदवार जाहीर केला होता. त्याऐवजी ऐनवेळी उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे मतदारसंघातील लढत ही रंगतदार ठरली आहे. असे असले तरी उदेसिंग पाडवी यांना हा मतदार संघ पुर्णत: नवीन आहे. त्यांचा फारसा संपर्क देखील या भागात नाही. त्यामुळे त्यांना मेहनत घ्यावी लागत आहे. डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दीपा वळवी, स्वाभिमानीचे अॅड. प्रकाश गांगुर्डे आणि बसपाचे विपूल वसावे हे देखील रिंगणात आहेत. काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी असतांनाही त्यांच्या उमेदवाराने या ठिकाणी माघार घेतलेली नाही. डॉ.विजयकुमार गावीत हे गेल्या 25 वर्षापासून या भागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे त्या कामांच्या जोरावर त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तर भाजपच्या नाराज गटातील, रघुवंशींसोबत न गेलेले कार्यकत्र्याना घेवून उदेसिंग पाडवी देखील प्रचाराला लागले आहेत. वंचीतनेही आपल्या प्रभाव क्षेत्रात प्रचार सुरू केला आहे. 

तापी-बुराई उपसा योजनेचे कामाला गती देण्यात आली, येत्या पंचवार्षीकमध्ये हे काम पुर्ण करण्याचा मनोदय.तापीवरील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करून आणत त्या कामांना सुरुवात. वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा नव्याने मंजुर करून पुढील वर्षापासून ते कार्यान्वीत करण्याचा संकल्प.खासदारांच्या माध्यमातून नंदुरबारला जोडणा:या सहा महामार्गाना मंजुरी.येत्या काळात नंदुरबारची एमआयडीसी कार्यान्वीत करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प.

25 वर्षापासून प्रतिनिधीत्व करीत असतांनाही एमआयडीचा प्रश्न सुटू शकला नाही. एकही उद्योग येवू शकला नाही.चिली पार्कचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कुठल्याही कामाची सुरुवात नाही.सरकारने शेतक:यांची कजर्माफी केली, परंतु अनेक शेतकरी अद्यापही त्यापासून वंचीत असल्याचा मुद्दा.तापीवरील उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत. 

लढतीतील सहा उमेदवार व त्यांचे पक्ष विजयकुमार कृष्णराव गावीत (भाजप), उदेसिंग कोचरू पाडवी (काँग्रेस), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी पक्ष), दीपा वळवी (वंचीत बहुजन आघाडी), विपूल वसावे (बहुजन समाज पार्टी), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष)