लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात १२ ग्रामपंचायत निवडणुकाचा निकाल घोषित झाला. सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या संपूर्ण आवारात बॅरेकेटींग करण्यात आली होती. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८५.६१ टक्के मतदान झाले. होते. ९१ जागांसाठी २२९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.माघारीअंती तालुक्यातील धुळीपाडा व सागाळी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील उमराण, धनराट, वडकळंबी, पळसून, ढोंग, रायंगण, उकळापाणी, नांदवन, चेडापाडा, बंधारपाडा, कोठडा, केळी या बारा ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीसाठी एकूण १२ टेबल लावण्यात आली होती. दोन फेऱ्यांत मतमोजणी झाली.नवापूर तालुक्यातील ढोंग, पळसून, उकळापाणी, वडकळंबी, चेडापाडा, उमराण, बंधारपाडा, केळी, रायंगण या ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा कायम राहिला आहे. यातून तालुक्यातील काँग्रेसचा दबदबा कायम असून माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक यांचे पुत्र आ. शिरीष नाईक यांच्या निवडणूक रणनीतीला यश मिळाले आहे. याबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, बिनविरोध झालेल्या धुळीपाडा भाजपाचा दावा आहे तर सागळी बिनविरोध ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.
रायंगण - प्रवीण नरसी वसावे, प्रफुल्ल बच्चू वसावे, लक्ष्मी ईश्वर वसावे, अतुल अर्जुन ठिंगळे. उमराण ग्रामपंचायतीत राहुल गुजरीया गावीत, अबीता दशरत गावित, गोरजी सखाराम गावित, मनीषा योगेश गावीत, वंदना नितीन पाडवी, जितेंद्र देवराम वसावे, वसावे सविता संजय, प्रितीशा चकू वळवी, सदाशिव धर्मा वसावे, सुभाष धनजी वसा, दीपिका सुनील वसावे. उकाळापाणी कांतीलाल बाबू गावित, गावित रवींद्र जीवा, गावित रुथा सेंगा, गावित विनायक ठगण्या, गावित किर्ती बाळकृष्ण, गावित इला सोना,गावित भिकू देवजी, गावित मीनाक्षी सुपा, गावित कांतु भीमा.वडकळंबी गावित कनसु रेवा, गावित सप्नना रुध्या, अमरसिंग अनिल गावित, गावित गीता मिलिंद, गावित विनु रवीस, गावित रवीता दिलीप, गावित जितु देवसिंग येथील प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागा यापूर्वी बिनविरोध झाली आहे. पळुसन कोकणी भालेराव तोडु, ठाकरे अमन बाबुलाल हे विजयी झाले. चेडापाडा वळवी इलु अजित, वसावे अंकुशराव बारक्या, वसावे सुना मनिलाल, वसावे सुनिता अंकुशराव, वळवी अजित शामसिंग, गावीत प्रियंका अनिल. बंधारपाडा वळवी रजनीकांत वंसत, गावित प्रियंका शंकर, गावित राहुल रवींद्र, अरुणा अनिल गावित, गावित महिमा चिमन, गावित याकूब रमेश, गावित जयमाला महेश, गावित रजनी बाहादुर, गावित अनिल बाबजी, गावित रतीलाल नकटिया गावित अरुणा अनिल.कोठडा कोकणी विरसिंग, कोकणी वनकर, सुरेखा कोकणी, गावित राहुल अमरसिंग, कोकणी बबिता, गावित रेखा नादल्या, सुरेश मोल्या गावित, गावित लता जाहागु, गावित मीराबाई दामू. नांदवन गावित अतुल राजु, गावित रविता याकुब, गावित सुनील गमन, गावित हिना दिलीप, गावित अरुणा पारत्या, गावित अंकुश लाजरस, गावित दिव्या सुभाष. ढोंगगावित सुनील किशन, पाडवी रवीश बावा, वळवी मीनाक्षी अविनाश, कोकणी देवराम ब्रिजलाल, कामळे कलावंती किशन, गायकवाड अनिताबाई कृष्णा, वळवी वीरसिंग बारक्या, कोकणी सोमीबाई मंगलदास, वळवी अल्का सुनील.धनराटगावित दिनकर भान्या, गावित शरद शिवाजी, गावित अशोक सहदेव, गावित मनीषा संदीप, वसावे दीपिका हरिष, गावित केवजी बापू, गावित जीजा वारीश, गावित हेमलबाई सुभाष.केळीगावित रवींद्र राजाराम, गावित दिलवरसिंग नाग्या, वसावे प्रमिला रमेश, निलेश पाताऱ्या गावित, गावीत नीलिमा उमेश, गावित जेसोदा सवलत, गावित उमेश वीरजी, गावित अनिता प्रवीण, वसावे सुगंती जितेंद्र हे विजयी झाले आहेत.
एका मताने विजय आणि पराभव नवापूर तालुक्यातील वडकळंबी ग्रामपंचायत पंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये रिता दिलीप गावित आणि विनू रवीश गावित यांना समान ११८ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात विनू रवीश गावित ह्या विजयी झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत मतमोजणी घेण्यात आली. केवळ तासाभरात १२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत अनेक नवीन तरुणांना संधी मिळाली आहे. दरम्यान, चेडापाडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रियंका अनिल गावित या केवळ एका मताने निवडून आल्या आहेत. त्यांना १३८ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वंदना प्रीतेश गावित यांना १३७ मते मिळाली. त्यांच्या या चुरशीच्या लढतीची मतमोजणीस्थळी चर्चा सुरू होती.