शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

पावसाळ्यातील कोरडे दिवस वाढवताहेत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:05 IST

भूषण रामराजे । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : जिल्ह्यात गेल्या वर्षात सरासरी 835 मिलीमीटर पावसाची नोंद होती़ पजर्न्यमानानुसार समाधानकारक असा हा पावसाळा असल्याचे म्हटले जात असले  तरी जून ते सप्टेंबर या काळातील पावसाच्या 122 दिवसांपैकी तब्बल 26 दिवस कोरडे गेले होत़े 2012-13 पासून सातत्याने वाढणारे कोरडे दिवस चिंतेचा विषय ठरत आहेत़ ...

भूषण रामराजे । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : जिल्ह्यात गेल्या वर्षात सरासरी 835 मिलीमीटर पावसाची नोंद होती़ पजर्न्यमानानुसार समाधानकारक असा हा पावसाळा असल्याचे म्हटले जात असले  तरी जून ते सप्टेंबर या काळातील पावसाच्या 122 दिवसांपैकी तब्बल 26 दिवस कोरडे गेले होत़े 2012-13 पासून सातत्याने वाढणारे कोरडे दिवस चिंतेचा विषय ठरत आहेत़  जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका हा पजर्न्यमानाला बसत आह़े 2012 नंतर सातत्याने पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने शेतीसह भूजल पातळीवर परिणाम होऊन टंचाईयुक्त गावांच्या संख्येत वाढ झाली आह़े वातावरणातील बदलांमुळे वाढणा:या कोरडय़ा दिवसांच्या संख्येत गेल्यावर्षी 4 दिवसांनी घट आली असली तरी गत पाच वर्षाच्या तुलनेत इतर दिवशी दीर्घ असा पाऊस न येता चार ते पाच तासाच्या काळात एकाच क्षेत्रात 60 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस होऊन शेतीपिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आह़े पावसाची ही तिव्रता ख:या अर्थाने जिल्ह्यातील शेतक:यांचे चिंतेचे कारण असून कोळदे ता़ नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने तीव्र पावसात शेती पिकांच्या संगोपनाबाबत मार्गर्दर्शन करण्याची तयारी दर्शवण्यात आली आह़े दरवर्षी तिव्र पावसाच्या संकटामुळे येत्या काळात वेगवान पावसापासून संरक्षित शेती संगोपन या विषयावरील मार्गदर्शन शेतक:यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञ आणि पजर्न्यमान तज्ज्ञांकडून व्यक्त झाले आह़े 4जिल्ह्यात पावसाळ्याची सुरुवात सात जून पासून प्रत्यक्षरीत्या होत़े गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात 8 जून 2017 रोजी 103 मिलीमीटर पाऊस झाला होता़ यानंतर 24 जून रोजी 221, 26 जून रोजी 108, 3 जुलै रोजी 178, 4 जुलै 206, 7 जुलै रोजी तब्बल 838 मिलीमीटर पाऊस झाला होता़ यानंतर संपूर्ण जुलै महिन्यात केवळ 22 रोजी 215 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ यानंतर 29 रोजी 199 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आह़ेऑगस्ट महिन्यात 30 ऑगस्ट 189 मिलीमीटर पाऊस वगळता इतर सर्वत्र 40 ते 93 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडला आह़े ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 15 दिवस पाऊस झालेला नसल्याचे समोर आले आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षात 5 हजार 15 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली होती़ साधारण 835 मिलीमीटर असे या पावसाचे स्वरूप होत़े यात नंदुरबार 644, नवापूर 1 हजार 122, शहादा 686, तळोदा 772, अक्कलकुवा 1 हजार 27 तर धडगाव तालुक्यात 761 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ केंद्रीय हवामान खाते, वेधशाळा आणि द एनर्जी अॅड र्सिोस इन्स्टिटय़ूट (टेरी) या संस्थेकडून जिल्ह्यातील बदलत्या हवामानाबाबत सातत्याने निरीक्षणे नोंदवण्यात आली होती़ यातील टेरीचा अहवाल नुकताच प्रसारित होऊन नंदुरबार जिल्हा तिव्र हवामानबदलाच्या कक्षेत असल्याचे म्हटले आह़ेयात नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणांमध्ये 2014 च्या पावसाळ्यात 22 दिवस, 2015 च्या पावसाळ्यात 32 दिवस, 2016 च्या पावसाळ्यात 40 दिवस तर गेल्या वर्षातील 2017 च्या पावसाळ्यात 26 दिवस कोरडे गेल्याचे समोर आले होत़े कोरडय़ा दिवसात 1 मिलीमीटरही पाऊस झाला नसल्याची नोंद आह़ेयातही 2016 या वर्षात तब्बल 32 तर गेल्या वर्षी 2017 मध्ये दोन पावसांमध्ये 36 दिवसांचा खंड होता़ 2012 पासून एक पाऊस पडून गेल्यानंतर दुसरा पाऊस येण्याचा खंड हा वाढत आह़े किमान 10 ते 12 दिवसांचा खंड दर वर्षी नोंदवला जात आह़ेपावसांमध्ये वाढलेल्या खंडामुळे शेतक:यांना दुबार, तिबार पेरणीसारख्या संकटांना सामोरे जावे लागत़े यंदाच्या वर्षात या खंडाबाबत विस्तृत अशी टिप्पणी नसली तरी दोन पावसातील वेळ वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले आह़ेपावसात वाढत्या अंतरामुळे कोरड क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होत़े कापूस आणि सोयाबीन या पिकांवर अवेळी पावसाचा सर्वाधिक परिणाम होत असल्याने शेतक:यांचे नुकसान होत़े