शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात जलयुक्तची दीड हजार कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:32 IST

27 कोटी रूपयांचा खर्च : 454 कामे अद्यापही सुरू असल्याचा दावा

नंदुरबार : जिल्ह्यातील 104 गावांमध्ये 2017-18 या वर्षात जलसंधारणाची 2 हजार 228 कामे घेण्यात आली होती़  यातील 1 हजार 585 कामे आजअखेरीस पूर्ण झाल्याची माहिती आह़े या कामांबाबत सातत्याने झालेल्या तक्रारी आणि चौकशीचे गोपनिय अहवाल यामुळे गेल्या वर्षात जलयुक्त योजना चर्चेत होती़ 9 विभागांनी ही कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाचा आह़े   राज्यात 2015-16 या आर्थिक वर्षापासून जलयुक्त शिवाराची कामे सुरू करण्यात आली होती़ जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात 2 हजार 817 कामे जलयुक्तच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आह़े कृषी विभाग, लघुसिंचन, जलसंधारण, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सव्रेक्षण यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या 9 विभागांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ही कामे राबवण्यात आली होती़ अनघड दगडी बांध, कंपार्टमेन्ट बंडीग, कोल्हापूर टाईप बंधारा/साठवण बंधारा दुरुस्ती, खोल सलग समतल चर, सिमेंट बंधारा/माती नाला बांध याच्यातून गाळ काढणे, गॅबियन बंधारे, जुने सिमेंट काँक्रिट नाला बांध, जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व माती नाला बांध, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, मातीचा बांध बांधणे, नैसर्गिक जलस्त्रोत बळकटीकरण, पुर्नभरण चर यासह विविध प्रकारची कामे या विभागांकडून पूर्ण झाल्याची माहिती आह़े यासाठी गेल्या वर्षात 27 कोटी 55 लाख 58 हजार रूपयांचा खर्च केल्याची माहिती आह़े 2017-18 या वर्षात कृषी विभाग 1 हजार 120, लघुसिंचन 235, जलसंधारण 170, वनविभाग 125, सामाजिक वनीकरण 11, भूजल सव्रेक्षण विभाग 239, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि नरेगा 127 तर इतर विभागांकडून 12 जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली होती़ या 2 हजार 39 कामांपैकी 2 हजार 161 कामांना प्रथम मान्यता देण्यात आली होती़ यातील 2 हजार 119 कामांना कार्यारंभ आदेश दिले गेल़े ही कामे सुरू झाल्यानंतर 1 हजार 585 कामे पूर्ण तर 454 कामे अद्यापही प्रगती पथावर असल्याचे सांगण्यात आले आह़े एकीकडे प्रशासनाने गेल्या वर्षात विविध विभागांकडून कामे पूर्ण करून घेतल्याचे म्हटले असले तरी यात कृषी विभागाने 107 कामे रद्द केली होती़ ही कामे रद्द करण्याची माहिती ही प्रशासकीय पातळीवर दिली गेली असल्याचे सांगण्यात आले आह़े याचप्रकारे वनविभागाने 35 कामे अद्यापही सुरूच केलेली नाहीत़ यामुळे जलयुक्तची 174 मंजूर असलेली कामे रखडली आहेत़  येत्या वर्षात विविध 9 विभागांकडून 189 गावांमध्ये जलयुक्त अभियानाची तयारी सुरू झाली आह़े यानुसार अंतिम आराखडा तयार करण्याच्या कामेही अंतिम टप्प्यात आहेत़ जिल्ह्यात गेल्या 2015 ते 2017 या काळात 3 हजार 3 हजार 72 कामांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला होता़ यात 3072 कामांना प्रथम मान्यता देण्यात आली होती़ यातील 2 हजार 817 कामे नोव्हेंबर 2017 र्पयत पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवले होत़े परंतू यातील 255 कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती असून नेमक्या कोणत्या विभागातील कामांना गती मिळालेली नाही़ याबाबत माहिती प्रशासनाकडून कडून मिळालेली नाही़अक्कलकुवा तालुक्यात गत तीन वर्षात मंजूर 814 कामांपैकी 777 पूर्ण तर 37 अपूर्ण आहेत़ धडगाव तालुक्यात 2015 ते 2017 या काळात केवळ 60 कामे मंजूर होती़ यातील 49 पूर्ण तर 11 अपूर्ण आहेत़ नंदुरबार 442 पैकी 369 पूर्ण तर 73 अपूर्ण आहेत़ नवापूर 1 हजार 169 पैकी 1 हजार 54 पूर्ण तर 115 कामे अद्यापही सुरूच आहेत़ तर शहादा तालुक्यात 587 पैकी 568 कामे पूर्ण असून 19 कामे अपूर्ण असल्याचा दावा करण्यात आला आह़े 2017-18 या वर्षात धडगाव तालुक्यात 18, नंदुरबार 21, शहादा 15, तळोदा 8, अक्कलकुवा 20 तर नवापूर तालुक्यातील 22 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ या गावांमध्ये 1 हजार 585 कामांना पूर्णत्त्व आल्याचे सांगण्यात आले आह़े