शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अध्यक्षांकडे वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:24 IST

नंदुरबार : अल्पसंख्याक समाजाला सवलती देण्यात येत नाहीत. शिष्यवृत्तीची बोंबाबोंब आहे. मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज ...

नंदुरबार : अल्पसंख्याक समाजाला सवलती देण्यात येत नाहीत. शिष्यवृत्तीची बोंबाबोंब आहे. मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरणे पास होत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारींचा पाढाच अल्पसंख्या आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांच्याकडे वाचला गेला.राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख हे सोमवारी नंदुरबारात आले होते. त्यांनी जिल्हास्तरीय बैठक घेवून अल्पसंख्याक समाजाच्या विविध शिष्टमंडळाशी चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अनेकांनी त्यांच्यापुढे समस्या व प्रश्न मांडले. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरणे पास केली जात नाही. या महामंडळांच्या जिल्हा अध्यक्षांकडे नाशिकसह नंदुरबार व इतर जिल्ह्यांचा पदभार आहे. त्यामुळे ते पाहिजे तसा वेळ देत नाहीत. परिणामी प्रकरणे प्रलंबीत राहत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. काहींनी कायदेशीर बाबींच्याही तक्रारी केल्या.यावर आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी महामंडळाच्या अध्यक्षांना स्वतंत्र पदभार देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी अल्पसंख्याक मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार आहोत. स्वयंरोजगार, शिक्षण यासाठीची कर्ज प्रकरणे तातडीने मंजुर करावेत अशा सुचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या. अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, आयोगाचे सचिव गणेश सुरवसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यावेळी उपस्थित होते.बैठकीत विविध शासकीय कार्यालयांमधील अल्पसंख्याकांचा अनुशेष, रिक्त जागा, कर्ज प्रकरणे, शिष्यवृत्ती प्रकरणे यासह इतर विविध विभागांचा आणि विषयांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रस्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, अल्पसंख्यक विद्याथीर्चे शिक्षणाचे प्रकरणे असोत की, कजार्चे प्रकरणे असोत ते प्रकरणे तातडीन मंजूर करण्यासाठी बँकांना सुचना देण्यात येणार आहेत.ज्या अल्पसंख्याक कुटुंबांना घरे नाहीत त्यांना प्रधानमंत्री आवाज योजनेतु तातडीने घरे देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.