शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सीबी गार्डन हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:45 IST

जखमींवर उपचार सुरू : 17 जणांविरोधात फिर्याद

नंदुरबार : शहरातील सीबी गार्डन येथे सोमवारी झालेल्या हाणामारीनंतर मंगळवारी पहाटे 17 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मारहाणीत जखमी झालेल्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ सोमवारी वाघोदा शिवारालगत असलेल्या सीबी गार्डन येथे किरकोळ वादातून हाणामारी झाली होती़ यात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने गाडय़ांची तोडफोड केली होती़ या घटनेत सय्यद रिजवाल अली सय्यद रहेमतअली  या युवकास लोखंडी रॉड आणि हॉकी स्टीकने जबर मारहाण करण्यात आल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े घटनेनंतर या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ जखमी रिजवानअली रहेमतअली याने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली़ या फिर्यादीनुसार सीबी गार्डनमध्ये सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गार्डनमध्ये गेलो असताना तेथील कर्मचा:यासोबत काही युवकांचा वाद झाला़ यातून माळी नामक कर्मचा:यासह आणखी 15 ते 16 जणांच्या जमावाले हॉकी, स्टीक, लोखंडी रॉड, लाठय़ा-काठय़ा याद्वारे मारहाण केली़ यावेळी संबधितांनी खिशातील साडेतीन हजार रूपये देखील काढून नेले होत़े दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बच्छाव करत आहेत़ मारहाणीच्या घटनेदरम्यान सीबी गार्डनसह परिसरात तोडफोड करण्यात आली होती़ या घटनेमुळे वाघोदा शिवारातील विविध रहिवासी वसाहतींसह धावपळ होऊन घबराट पसरली होती़ घटनेनंतर बघ्यांची गर्दीही येथे जमा झाली होती़ सीबी गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा वाद झाल्याची माहिती आह़े वादादरम्यान झालेल्या हाणामारीत वाहनांसह खाद्यपदार्थाच्या गाडय़ा आणि दुचाकी वाहनांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े वॉटरपार्क परिसरात हुल्लडबाजी करणा:या युवकांना समज देत असताना हा वाद घडला़ घटनेनंतर शहरातील विविध भागात अफवांचे पीक आले होत़े अफवांमुळे काहींनी सीबी गार्डनकडे धाव घेतली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार उशिरार्पयत येथे तळ ठोकून होत़े