शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

आदिवासींच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात तक्रार : के़ सी़ पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:35 IST

धनगर समाज सवलती : के़सी़पाडवी यांंची पत्रकार परिषदेत माहिती

नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्याचा निर्णय म्हणजे राजकीय लाभ मिळविण्याचा प्रकार आहे. या विरोधात थेट राष्टÑपतींकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.धनगर समाजाला अनुसुचित जमातीप्रमाणे सवलती देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासे केले़यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, भाजपा पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते़ परंतू आता निवडणूकांच्या तोंडावर धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याची घोषणा म्हणजे राजकीय लाभ उठविण्याचा हा प्रकार आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रपती यांना पत्र लिहून पाचव्या अनुसुचितील तरतूदीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा घटनाबाह्य असल्याचे कळवले आहे़ अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाच्या ट्रायबल अ‍ॅडव्हायझरी कमिटी आणि मानववंशशास्त्रज्ञ यांचा अहवाल घेणे गरजेचे होते़ यापूर्वीचे अहवाल हे धनगर समाजाला आरक्षण नाकारत असताना त्यांचा विचार न करता टाटा सोशल सायन्सेस इन्स्टिीट्यूटच्या अहवालानुसार त्यांनी हा निर्णय घेतला असल्याने तो घटनाबाह्य आहे़ यातून धनगर समाजाची दिशाभूल होत असून आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का पोहोचत आहे़आदिवासी विकास विभागाला गेल्या साडेचार वर्षात दिल्या गेलेल्या ८ हजार ९९७ कोटींपैकी ५ हजार ४२४ कोटी रुपयांचा निधी हा अखर्चिक आहे़ यातून आदिवासींचा कोणता विकास केला, हे स्पष्ट होत आहे़ आदिवासी समुदायाला सुप्रिम कोर्टात लढण्यासाठी आरएसएसचे काम करणारे वकील खटले हे जुजबी पद्धतीने लढून निकाल आदिवासींच्या विरोधात लावण्याचा सपाटा सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही आमदार पाडवी यांनी केला़आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजन डीबीटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राज्यातील सर्व पक्षीय २२ आदिवासी आमदार व चार खासदार हे डिबीट रद्द करण्यासाठी लढा देत असून हे श्रेय कोण्या एकाचे नाही, आंदोलक विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले़