शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील समशेरपूर येथे पाणी मिळवण्यासाठी लागते स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:45 IST

नंदुरबार तालुका : कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ाने ग्रामस्थ मेटाकुटीस

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, शिंदे, कोळदे, खोंडामळी आदी परिसरात पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी हंडा, कळशी, बाधली घेऊन रांगा लावत असल्याची भिषण स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आह़ेगेल्या 15 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची पाणी टंचाई नंदुरबार तालुक्यातील गाव-पाडय़ांमध्ये निर्माण झालेली आह़े त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पाणी मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आह़े एकीकडे लोकांना पैसे, दाग-दागिणे याचे भूषण असते तर, या गावात मात्र गावात पाणी येते त्या दिवशी कोणी किती बाधल्या पाण्याचा साठा केला यावर ग्रामस्थांकडून मनोमन समाधान व्यक्त करण्यात येत असत़े त्यामुळे यावरुन तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा किती तीव्र आहेत हे दिसून येत आह़े मजुरांना बुडवावा लागतोय रोजगारपाण्याची भिषण टंचाई असल्याने ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी पाण्याचा जास्तीत जास्त साठा करण्यासाठी मजुरांना रोजगार बुडवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े या ठिकाणी येणा:या पाण्याचा दाबही अत्यंत कमी आह़े त्यामुळे साहजिकच एक बाधली भरण्यासाठीही साधारणत  पाच ते दहा मिनीटांचा अवधी लागत असतो़ शिवाय पाणी येण्याच्या वेळेचीही शाश्वती नसल्याने पाणी येणार त्या दिवशी येथील ग्रामस्थ नळाकडे आस लावून बसलेली असतात़ वाढत्या तापमानामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी पातळी खोल गेली आह़े कुपनलिकासुध्दा आटल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून पाण्याच्या उपलब्धतेसाठी ‘रिबोरींग’ करण्यात येत आह़े तसेच काहींकडून कुपनलिकेत पाईप सोडून मोटारीव्दारे पाणी काढणे शक्य आहे काय याची चाचपणी करणे सुरु झाले आह़े या सर्व गोष्टींसाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च होत आह़े आधीच नापिकी आणि त्यात पाण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे येथील पाणी पातळी साधारणत आठशे फुटांर्पयत खोल गेली आह़े एप्रिल महिन्यातच नंदुरबार तालुक्यातील बहुतेक गावांची पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेली होती़ त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होत़े प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी होत आह़े