शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातील विकास कामांचा जिल्हाधिका:यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : धुलीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या 1 जुलै पासून कार्यान्वित करावे व तालुक्यात सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : धुलीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या 1 जुलै पासून कार्यान्वित करावे व तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी संबंधीत विभागांनी करावी अश्या सूचना जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे यांनी दिल्या. नवापूर तालुक्यातील गाव निहाय विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे नवापूर तालुक्यात प्रथमच आल्याने तालुक्यातील अधिकारीच्या भुवया चांगल्याच उंचावलेल्या दिसत होत्या. धुलीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू असून, अत्यत देखणी इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे कौतुक करून लोकांसाठी हे उपकेंद्र 1 जुलै पासून सेवेत आणावे अश्या सूचना त्यांनी केल्या. तसेच नवापूर शहरातील नेहरू उद्यान व इतर उद्यानाची झालेली दयनीय अवस्थेचीही जिल्हाधिकारी मंजुळे यांनी पाहणी करत अधिका:यांना समज देवून संबंधीत उद्यानाची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या सूचना तहसील कार्यालय व पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत अधिका:यांना दिल्या. दुपारी एक वाजता  जिल्हाधिकारी यांचे आगमन झाले. तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिका:यांकडून तालुक्यात जावूंन खासदार, आमदार निधितून झालेली व इतर विभागाकडून झालेल्या विकास कामांची त्यांनी माहिती घेतली. सोनपाडा येथील विद्युत रोहित्र कागदोपत्री असताना काम झालेले नसल्याचे निदर्शनात आल्याने नाराजी व्यक्त केली असून, इतर कामांबाबत समाधानी असल्याचे  जिल्हाधिका:यांनी म्हटले आहे. दुपारी पाच वाजता नगर पालिका सभागृहात बैठक घेऊन स्वच्छता व शहरातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या.   जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबारला आल्यानंतर प्रथमच नवापूर शहरात आगमन झाले. त्यानिमित्त नवापुरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटनेता गिरीश गावीत, सर्व नगरसेवकांनी शाल व पुष्प गुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी  तहसीलदार सुनीता ज:हाड व तालुक्यातील सर्व  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.