शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी जिल्हाधिका:यांकडून सारंगखेडा यात्रेकरुंच्या सुविधांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने यात्रेची व चेतक फेस्टीव्हलमार्फत होणा:या उपक्रमांची तयारी जोरात सुरू आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी यात्रास्थळ व इतर जागांची पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना केल्या. सारंगखेडा यात्रा महोत्सव यंदा आगळा-वेगळा होत असून पर्यटन विभाग व चेतक फेस्टीव्हल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने यात्रेची व चेतक फेस्टीव्हलमार्फत होणा:या उपक्रमांची तयारी जोरात सुरू आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी यात्रास्थळ व इतर जागांची पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना केल्या.सारंगखेडा यात्रा महोत्सव यंदा आगळा-वेगळा होत असून पर्यटन विभाग व चेतक फेस्टीव्हल समितीमार्फत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात अश्व स्पर्धा, महिलांसाठी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची मेजवानी यात्रेकरू व भाविकांना मिळणार आहे. यात्रा महोत्सवात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी टेंभा रस्त्यावरील टेंट सिटी, घोडा बाजार, मुख्य बाजार, भांडी बाजार, आनंद मेळा आदी जागांची पाहणी करून फेस्टीव्हलच्या आयोजकांकडून माहिती जाणून घेतली. यात्रा परिसरात स्वच्छतेबाबत व व्यावसायिकांनी आपली दुकाने नेमून दिलेल्या जागेतच लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांना दिली. वाहने पार्कीगच्या जागेची पाहणी करून लोंबकळणा:या वीज तारा व खांबांची दुरुस्ती, यात्रेकरूंना वीज, पाणी, घोडे बाजारात पुरविल्या जाणा:या सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री व इतर मान्यवर यात्रा महोत्सवात येणार असल्याने हेलिपॅडच्या जागेची पाहणीही त्यांनी केली. टेंभा रस्त्यावर उभारण्यात येणा:या टेंट सिटीसमोरील जागा व पर्यायी जागा म्हणून कळंबू येथील बीजगुणन केंद्रात जाऊन त्यांनी पाहणी केली. यात्रा काळात महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करून संबंधित विभागांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.या वेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, रणवीर रावल, ग्रा.पं. सदस्य चंद्रपाल रावल व चेतक फेस्टीव्हल समितीे सदस्य उपस्थित होते.