लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील संत आसारामजी आश्रमात सर्वपित्री अमावस्येनिमित्त सामूहिक पितृश्राद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील आसारामजी बापू आश्रमात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेर्पयत सामूहिक श्राद्ध कार्यक्रम झाला. साधकांनी प्रार्थना, पितृ प्रसन्न, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, गीतापाठ, नारायण नागबली, महापुष्प पूजन, बत्तीस पिंड पूजन सूर्यदर्शन, तापी नदीत स्नान आदी विधी केले. प्रकाशा, सुजालपूर, कोरीट, डामरखेडा, करजई, बुपकरी, नांदर्डे, शेल्टी, सजदे, लांबोळा, लोणखेडा, निझर, पानसेमल, नंदुरबार, शहादा येथून भाविक पूजनासाठी आले होते. ही पूजा पानसेमल येथील पुरोहित भटू कुलकर्णी यांनी केली. या वेळी आश्रमचे साधक धिरजभाई व वासुदेवजी यांनी परिश्रम घेतले. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रकाशा येथील आश्रमात सामूहिक पितृश्राद्ध पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:57 IST