शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुजालपूर येथील शिबीरात 46 रक्त पिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:53 IST

नंदुरबार : रक्तदानासाठी तरुणांची फळी निर्माण व्हावी, याला लोकचळवळीचे स्वरुप मिळून जिल्ह्यात रक्तदानाचा टक्का वाढावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी                    डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली़  नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होत़े प्रमुख पाहुणे म्हणून ...

नंदुरबार : रक्तदानासाठी तरुणांची फळी निर्माण व्हावी, याला लोकचळवळीचे स्वरुप मिळून जिल्ह्यात रक्तदानाचा टक्का वाढावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी                    डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली़  नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होत़े प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष डॉ़ कांतीलाल टाटीया, जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, अण्णासाहेब पी़क़े पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष शितलकुमार पाटील आदी उपस्थित होत़े पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी म्हणाले की, जिल्ह्यात रक्तदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आह़े वाढते अपघात तसेच वेळ प्रसंगी उद्भवणा:या आपातकालिन परिस्थितीमध्ये रक्ताचे महत्व अनन्यसाधारण असल्याचेही त्यांनी सांगितल़े रक्तदान हे महादान आह़े  जशी चळवळ सुजालपूर येथे निर्माण झाली तशीच चळवळ इतरही गावांमध्ये निर्माण होणे गरजेचे आह़े त्यामुळे सर्वानी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन डॉ़ कलशेट्टी यांनी केल़े दरम्यान, यानिमित्ताने परिसरातील रक्तदान शिबीरात सहभाग घेणा:या ग्रामस्थ तसेच कार्यकत्र्याचा जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ त्यासोबतच झाडे लावा, झाडे जगवा, जलमंदिर, जलसंधारण, नाला खोलीकरण आदी कामात अग्रेसर असलेल्या ग्रामस्थांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला़ सदर उपक्रमासाठी सरपंच संतोष भिल, उपसरपंच राजाराम पाटील, प्रवीण पाटील, गोविंद पाटील, स्वप्निल पाटील, सुनील पाटील, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत महाराज, सर्व तरुण मित्र मंडळ              यांनी परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला़ रक्तदान शिबीरात एकूण 46 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आल़े रक्त पिशव्यांचे संकलन धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेकडून करण्यात आल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी  केल़े