शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्याने निवडणूका असलेल्या क्षेत्रात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते.डॉ.भारुड म्हणाले, ग्रामीण भागात उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक प्रक्रीयेत विशेष दक्षता घेण्यात यावी. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत ग्रामसेवकांना सुचना देण्यात याव्यात. राजकीय पोस्टर्स आणि बॅनर्स काढण्यात यावे. विशेषत: शासकीय इमारत परिसरात लोकप्रतिनिधींची नावे असणारे फलक झाकण्यात यावे.निवडणूक निकाल जाहीर होईपयर्ंत आचारसंहिता अंमलात राहील. जिल्हा परिषदेतील मतदारावर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींना करता येणार नाही. या कालावधीत शासकीय यंत्रणा किंवा पदाचा दुरुपयोग करता येणार नाही. आचारसंहिता लागू असणा:या क्षेत्रात नियोजन समिती किंवा अन्य समितीची बैठक घेता येणार नाही. आचारसंहिता कालावधीत नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी कामे करण्यास बंदी असणार नाही.निवडणूक जाहीर होत असताना प्रत्यक्ष सुरू असलेली कामे सुरू ठेवता येतील. स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून झालेल्या कामाचे भूमीपुजन किंवा उद्घाटन करता येणार नाही. शासकीय वाहनांचा प्रचारासाठी उपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात याव्यात व निवडणूकीसाठी आवश्यक पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार करण्यात यावी, असे त्यांनी    सांगितले.यावेळी श्री.निकम यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून आचारंहितेतील ठळक बाबींची माहिती दिली. मतदान 7 जानेवारी तर मतमोजणी 8 जानेवारी रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 56 निवडणूक विभाग व 112 निर्वाचक गण असून 10 लाख 7 हजार 347 मतदार 1,232 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.