शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

भराव खचल्याने आहवा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापुरात संततधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी पावसाची दहशत मात्र कायम आहे. उकाळापाणीजवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापुरात संततधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी पावसाची दहशत मात्र कायम आहे. उकाळापाणीजवळ रस्त्याचा भराव खचल्याने आहवामार्गे गुजरातमधील वाहतूक ठप्प झाली आहे तर खोकसा प्रकल्पास गळती लागल्याने धरण फुटीची भीती कायम आहे. गेल्या तीन दिवसापांसून तालुका संततधार पावसाने जलमय झाला होता. रविवारी एकाच दिवसात 328 मिलीमीटर असा विक्रमी पाऊस पडला. रंगावली नदीवरील पुलावरुन व प्रतापपूर येथील पुलावरील वाहतूक   सोमवारी सुरळीत झाली.  नगराध्यक्षा हेमलता पाटील, तहसीलदार सुनिता ज:हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी रंगावली नदीकिनारी असलेल्या वस्त्यांमधे पाहणी केली. नदीकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमधे आजही भीती पहावयास मिळाली.सोमवारी परिवहन सेवा पूर्ववत झाल्याने शहरात वर्दळ दिसून आली. आहवाकडे जाणा:या राज्य मार्गावर उकाळापाणी या जंगल क्षेत्रात रस्त्याचा भराव खचल्याने आहवाकडे वाहनांची ये-जा बंद झाली. नवापूर आहवा राज्यमार्ग पूर्णत: बंद झाला. भरडू येथील नागन प्रकल्प भरला असून प्रकल्पाच्या चारपैकी एक दरवाजा खुला करुन पाणी सोडण्यात आले.  धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी दुपारी रंगावली नदीवरील नयीहोंडा भागातील पुलाजवळून पुराच्या पाण्यात  वाहून गेलेल्या शकुर शेख चांद काकर या 55 वर्षीय अपंग वृद्धाचा मृतदेह गुजरातमधील वंजारी गावाजवळील उकाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मिळून आला. बोरपाडा गावाजवळील खोकसा येथील प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर भगदाड असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरणफुटीची भीती व्यक्त होत आहे. धरण फुटल्याची अफवा रविवारीच पसरली होती. विसरवाडी येथील सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी रविवारी सायंकाळीच खोकसा येथे जाऊन प्रकल्पाची पाहणी केली. संबंधित विभागाचे तज्ञ व अधिकारी नसल्याने त्यांनी दिलेल्या भेटीबाबत तहसीलदार यांना अवगत करुन दिले. गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला होता. खोकसा प्रकल्पाचे पाणी नागङिारी प्रकल्पात येते. नागङिारी प्रकल्प आधीच पूर्णत: भरला आहे. त्यातच खोकश्याचे पाणी नागङिारी प्रकल्पात आल्यास मोठा अनर्थ घडेल. नागङिारी ते नवापूरदरम्यान असलेल्या अनेक गावांना त्याची झळ बसेल, अशी स्थिती असल्याने खोकसा धरण फुटीच्या अफवा व शक्यतेबाबत संबंधित विभागाने सजग राहून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.