लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : शाळेच्या विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे बँकेत भरणा न करता संगनमत करून स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता संस्थेच्या २१,५७,७९१ रुपये रकमेचा संस्थेतील तिघांनी अपहार करून संस्थेची फसवणूक केली. याप्रकरणी तळोदा पोलिसांत अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम शाळेच्या सन २०१६ ते २०१९ दरम्यान एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम शाळेचा के. जी. विभाग, प्रायमरी विभाग, हायस्कूल विभागामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी भरणापैकी २१,५७,७९१ रुपये इतकी रक्कम शाळेच्या बँक खात्यात न भरता करता वेलेरिना दीपक एलिस (रा.न्यू पटेल वाडी कोरिट रोड नंदुरबार,) चंद्रकांत एबीनेजर चांदेकर (रा. एस. ए. मिशन शाळा कॅम्पस तळोदा), प्रमोद विलास सोनार (रा. विष्णूनगर आंबेडकर चौकजवळ धुळे,) यांनी आपआपसात संगणमत करून अपहार केला. ट्रस्टची शाळेची फसवणूक केली म्हणून, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश जेमा वळवी (रा. मिशन बंगला), एस. ए. मिशन हायस्कूल कॅम्पस नंदुरबार यांनी फिर्याद दिल्यावरून या तिघांविरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे करीत आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडाली आहे.
लिपिकांनी मारला २१ लाखावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 21:44 IST