शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे नमुने अप्रमाणित असल्याने शहाद्यात 16 खत कंपन्यांविरोधात न्यायालयात दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 13:28 IST

9 ठिकाणी तपासणी

ठळक मुद्देशहादा तालुक्यात 9 ठिकाणी तपासणी संबधित कंपन्यांना नोटीसा

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 16- पंचायत समितीचे कृषी विभागाने शहादा तालुक्यातील कृषी सेवाकेंद्रांची तपासणी करून खत व कीटकनाशांचे नमुने  तपासणीसाठी प्रयोग शाळेत दिले होत़े यातील 16 खत आणि दोन किटकनाशक कंपन्यांचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर खत नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम याप्रमाणे शहादा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आह़े 2015-16 या वर्षात कृषी अधिकारी तथा बियाणे गुणवत्ता नियंत्रक ए़जी़कागणे यांनी शहादा तालुक्यात 9 ठिकाणी तपासणी करत कारवाई केली होती़ 2016-17 या वर्षातही त्यांनी 8 विक्रेत्यांकडून नमुने घेत कारवाई केली होती़ कारवाईनंतर   संबधित कपन्यांचे नमुने तपासणी करण्यात आली होती़ हे नमुने पूर्णपणे अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने संबधित कंपन्यांना नोटीसा दिल्या होत्या़ यात काहींनी दिलेल्या प्रतिसाद दिला होता़ तर इतरांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले होत़े तपासणी नमुने अप्रमाणित आढळल्याचा ठपका ठेवत सर्व 18 कंपन्यांविरोधात शहादा न्यायालयात बुधवारी दावा दाखल करण्यात आला़ न्यायालयात कामकाजादरम्यान संबधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ एव्हरग्रीन मायक्रोन्युट्रिएंट पुणे, सन अँड ओसिन अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे, डेबॉन अॅग्रो इंडस्ट्रीज, कर्नाटका अॅग्रो केमिकल बँगलोर, अॅपेक्स अॅग्रो इंडस्ट्रीज भरुच, भाग्योदय इंडस्ट्रीज वाघोदा, निर्माण फर्टिलाइजर प्रा. लि, अनुमान अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे, जी. बी.अॅग्रो इंडस्ट्रीज, एन. के. फर्टिलाइजर यांचे दुय्यम खतांचे नमुने अप्रमाणित तर कोरोमंडल इंटरनेशनल लिमिटेड सिकंदराबाद, भारत अॅग्री फर्टिलाइजर पालघर, यांचे सिंगल सुपर फास्फेट चे नमुने अप्रमाणित आले होत़े इंडियन पोटॅश लिमीटेड, हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड भरूच, कृभको, जुआरी अॅग्रो केमिकल गोवा यांचे संयुक्त खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने त्यांच्याविरोधात शहादा येथील मा. न्यायालयात खत (नियंत्रण) आदेश 1985 च्या कलम 13 (2) व 19 (ब) तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 च्या नियम 3 व 7 अंतर्गत दावे दाखल करण्यात आले आहेत़ हेरंबा इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीचे इमिडॅक्लोप्रीड व अनु प्रोडक्ट लिमीटेड फरीदाबाद कीटकनाशक कंपन्यांचे नमुनेही संशयास्पद आढळल्याने दावा दाखल आह़े