शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलच्या सीटी स्कॅन दुरूस्तीला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सिव्हीलचे सीटी स्कॅन दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. मशीन खराब होण्यास तीन आठवडे झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिव्हीलचे सीटी स्कॅन दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. मशीन खराब होण्यास तीन आठवडे झाले तरी खराब झालेला पार्ट अद्याप येऊ शकला नसल्याची स्थिती आहे. यामुळे रुग्णांना खाजगी ठिकाणी जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सीटी स्कॅन ऐवजी एक्सरेवर काम भागवावे लागत आहे.  नंदुरबारचे सीटी स्कॅन मशीन गेल्या तीन आठवड्यापासून खराब झाले आहे. खराब झालेला पार्ट हा विदेशातूनच मागवावा लागणार असल्याचे मशीन पुरविणाऱ्या डिलरचे म्हणने आहे. त्यानुसार तसा पाठपुरावा सिव्हीलतर्फे करण्यात आला. परंतु अद्यापही तो पार्ट येऊ शकला नसल्याची स्थिती आहे. तीन वर्षांपासून मशीन गेल्या तीन वर्षांपासून येथील सीटी स्कॅन सुरू आहे. परंतु तंत्रज्ञच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे मशीन येऊन देखील साधारणत: एक ते दीड वर्ष तंत्रज्ञ नसल्यामुळे धुळखात पडून होते. जेमतेम धुळे येथून आठवड्यातून दोन ते तीन दिवस तंत्रज्ञ येऊ लागला. त्यानंतर स्थानिक एक्स रे टक्नीशिअन यांना मशीन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महागडे सीटी स्कॅन मशीन चालविण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञांची भरती करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी अप्रतिक्षीत कर्मचाऱ्यांकडून ते चालविले जात असल्यामुळे त्यात बिघाड होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणने आहे. याबाबत गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. 

रुग्णांना खाजगी ठिकाणी घ्यावी लागतेय धाव...सीटी स्कॅन मशीन हे वॅारंटीच्या मुदतीत आहे. त्यामुळे एखादा पार्ट खराब झाल्यास त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी व तो पार्ट मागविण्याची जबाबदारी संबधीत डीलरची आहे. आता देखील खराब झालेला पार्ट बदलून देण्यासाठी संबधीत डीलरने कंपनीकडे संपर्क साधला आहे. मशीन खराब असल्याने सामान्य रुग्णांना मात्र खाजगी ठिकाणी जाऊन सीटीस्कॅन करावे लागत आहे. कोरोना रुग्णांसाठी सीटी स्कॅन करणे आवश्यक असते. परंतु बंद असल्यामुळे अनेक रुग्ण खाजगी ठिकाणी धाव घेत आहेत.