शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

नंदुरबार शहरात वर्षभरात बेशिस्तीच्या 8 हजार केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विविध भागातून बेशिस्तरितीने वाहन चालवत कायदा मोडणा:यांवर शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतून 16 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान आठ हजार केसेसमध्ये बेशिस्तांना हा दंड करण्यात आला होता़  नंदुरबार शहर व लगतच्या मार्गावरून बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून नियम धाब्यावर बसवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विविध भागातून बेशिस्तरितीने वाहन चालवत कायदा मोडणा:यांवर शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतून 16 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान आठ हजार केसेसमध्ये बेशिस्तांना हा दंड करण्यात आला होता़  नंदुरबार शहर व लगतच्या मार्गावरून बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून नियम धाब्यावर बसवून वाहनचालवण्याची स्पर्धा सुरू असत़े यावर चाप बसवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून दर महिन्याला धडक कारवाई करण्यात येत आह़े याचे फलित म्हणजे शहरात दर महिन्याला हजाराच्या जवळपास बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली आह़े यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होत असून बेशिस्तांनाही शिस्त लागल्याचे सांगण्यात येत आह़े वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरात वर्षभर तैनात राहून बेशिस्तांवर लक्ष ठेवून असतात़ शहरात सम-विषम वाहतूक-गिरीष पाटीलवाहतूक शाखेकडून अवैध प्रवासी वाहनांवरही 11 महिन्यात कारवाई केली होती़ यात एकूण 63 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होत़े यातील 43 अवैध प्रवासी वाहनधारकांना न्यायालयाने 21 हजार 500, दोन वाहनधारकांना 1400, तीन वाहनधारकांना 15 हजार, 11 वाहनांना 16 हजर 500 रूपयांचा दंड देत कारवाई केली होती़ या सर्व वाहनमालकांनी रक्कम भरल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली़ याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीष पाटील यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितल की, लोकांनी आधी वाहतूकीच्या बाबत स्वयंशिस्त पाळायला हवी, शहरात रस्ते अरूंद असून वाहने वाढली आहेत़ यावर योग्य त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आह़े पुढील काळात समविषम वाहतूकीसह पार्किगसाठी जास्तीत जास्त जागा वाहनधारकांना कशी मिळवून देता, येईल याबाबत प्रयत्न सुरू आह़े यासाठी मंगळबाजार आणि इतर वाहनधारकांसोबत बैठक घेऊन चर्चाही करण्यात आली आह़े वाहतूक शाखेकडून शहरातील विविध भागात नियुक्त करण्यात आलेले दोन अधिकारी व 35 कर्मचारी यांच्याकडून सातत्याने शहरातील विविध भागात बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली होती़ दुचाकीवर दोनपेक्षा अधिक, प्रवेश नसलेल्या रस्त्यात वाहन चालवणे, विनापरवाना, विना कागदपत्रे, मोटारसायकलीवर क्रमांक नसणे, मोबाईलवर बोलणे, रस्त्यात उभे राहणे यासह गुजरात व मध्यप्रदेशातून येणा:या दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली होती़ या वाहनधारकांकडून चौकाचौकांमध्ये तैनात करण्यात आलेल्या कर्मचा:यांनी तात्काळ दंड वसूली करत त्यांना मेमो दिल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आह़े नंदुरबार शहरात दिवसेंदिवस वाढणा:या बेशिस्तीच्या घटनांवर वचक बसवण्यासाठी वाहतूक शाखेकडून महत्त्वाच्या चार ते पाच चौकांमध्ये काही अंशी जागा मोकळी करून रूंदीकरण मोहिम सुरू करण्यात येणार आह़े यासाठी नगरपालिका प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली असून येत्या काळात चौक मोकळे करण्याची कारवाई सुरू होणार आह़े यासोबत शहरातील नेहरू चौक आणि धुळे चौफुली या दोन ठिकाणी सिगAल व्यवस्था करण्याची तयारी पोलीस प्रशासन करत आह़े यासाठी पालिका प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला असून प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतरही ठिकाणी सिगAल कार्यान्वित होणार आहेत़