शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाचा ई-पास मिळवण्यासाठी नागरिक वापरताहेत विविध ‘फंडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाहेरगावी प्रवास करता यावा यासाठी नागरिकांना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे़ यात वैद्यकीय कारणासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाहेरगावी प्रवास करता यावा यासाठी नागरिकांना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे़ यात वैद्यकीय कारणासाठी प्रवास करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असून इतर कारणांना दु्य्यम स्थान देण्यात येत आहे़ परंतु या दुय्यम स्थानातील कारणांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पास मिळावा यासाठी विविध कारणे दिली जात आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयांकडून आजअखेरीस ३८ हजार ५८१ जणांना ई-पास देऊन बाहेरगावी जाण्याचा परवाना देण्यात आला आहे़ तर ९ हजार ५७१ जणांचे अर्ज ठोस कारण नसल्याने नाकारण्यात आले आहेत़ वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आधारकार्ड असे दोनच कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करण्याची सोय आहे़ प्रामुख्याने वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी जाणाºया नागरिकांना तातडीने ई-पास दिला जात आहे़ परंतू मुलासाठी मुलगी पाहवयास जाण्याचा कार्यक्रम, छोट्या स्वरूपात विवाह, साखरपुडा, नोकरी, व्यवसायानिमित्त रक्कम वसुली, शैक्षणिक कामे, नातेवाईक मयत झाल्यास भेटी यासह विविध कारणे देत नागरिक ई-पासची मागणी करत आहेत़ यात केवळ विवाह सोहळा हा एकच ठोस कार्यक्रम पुराव्यासह देता येतो़ यातून काही जण विवाह सोहळ्यांच्या नावाने पत्रिका तयार करुन प्रवास करत आहेत़ परजिल्ह्यात कागदपत्र पडताळणी वेळी या पत्रिका दाखवून वेळ मारुन नेण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे़ शैक्षणिक कामांसाठी जाणाºयांना केवळ विद्यापीठ किंवा शिक्षण मंडळाच्या कामांसाठी परवाने दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे़वैद्यकीय कारण असल्यास तातडीने परवाना देण्यात येत असल्याने अनेकांनी बाहेरगावी तपासणी केलेल्या जुन्या फाईल्स काढून त्या प्रमाणपत्र म्हणून रिसबमिट करत परवाने मिळवल्याचेही समोर आले आहे़ तपासणीच्या नावाने गावी जात असल्याचे त्यांनी नमूदही केले होते़ शासनाने ई-पाससाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर आधार कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करण्याचीच सोय केली आहे़ यातून मग इतर कारणांनी प्रवास परवाने मिळवणे अडचणीचे होत असल्याचे दिसून आले आहे़ शासनाने संकेतस्थळावर तसा बदल करण्याची गरज आहे़