शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संथगतीच्या कामामुळे नागरिक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील वर्षी हाती घेण्यात आलेल्या समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम आजही अर्धवटच राहिले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील वर्षी हाती घेण्यात आलेल्या समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम आजही अर्धवटच राहिले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. तर काम अपुरे राहिल्यामुळे प्रवासी व वाहनधारकांमध्येही नाराजीचा सुर उमटत आहे.नंदुरबार तालुक्यातील तापी काठावरील गावांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, तेथील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व दळण-वळणाच्या सुविधाही मिळाव्या यासाठी सार्वजनिक विभागामार्फत मागील वर्षी समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता शिंदे, खोडसगाव, वरुळ या गावांसह अन्य गावांमधून काढण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. हे काम सुरुच असले तरी ते संबंधित यंत्रणेमार्फत अत्यंत संथ गतिने केले जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.पावसाळ्याच्या कालावधीत अर्धवट कामामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल तयार झाले होते. त्याचा नागरिकांना सामना करावा लागला होता, त्यानंतर सद्यस्थितीत प्रचंड धुळ उडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सर्वच हंगामात या रस्त्याच्या कामाला तोंड द्यावे लागत आहे. या कामाला गती देत तातडीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी ठेकेदारांकडे पाठपुरावा करुनही त्यांच्याकडून अपेक्षेनुसार लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.तर ठेकेदारांकडून योग्य काम केले जात नसल्यामुळे या रस्त्वावरुन होणाऱ्या वाहतुकीला मोठी अडचण देखील निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी जेसीबीद्वारे काम करतांना कामात योग्यता ठेवली गेली नाही. त्यामुळे अन्य वाहनधारकांना अडचण आल्याचे सागण्यात येत आहे. तर रस्त्यावरील विजेचे खांब पडण्याच्या स्थितीत असून त्याच्यापासून अनुतिच घटना घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर प्रवासी व वाहनधाकरांनाही या अर्धवट रस्त्याचा त्रास होत असून काम तातडीर्न पूर्ण करण्याची मागणी होत आहे.